तुमचा बच्चन तर आमचा रणवीर, भारतीय क्रिप्टो बाजारांत काटे की टक्कर

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज कॉईनस्विच कुबेरने 8 ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता आणि युवा आयकॉन रणवीर सिंगला त्यांचा पहिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून करारबद्ध केल्याची घोषणा केली. या असोसिएशनच्या माध्यमातून, Gen Z आणि मिलेनियल ग्राहकांमध्ये रणवीर सिंगच्या लोकप्रियतेचा मोठ्या प्रमाणात लाभ त्यांच्या प्लॅटफॉर्मला होईल. (Coinswitch Kuber signs Ranveer Singh as brand ambassador)

रणवीर सिंग कॉईनस्विच कुबेरसाठी ‘कुछ तो बदलेगा’ मोहिमेसाठी तीन जाहिरातींत दिसणार आहे. कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर पहिली जाहिरात फिल्म आधीच अपलोड केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “जाहिरातीत भारतीयांसाठी विशेषत: टीयर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी क्रिप्टोकरन्सीबाबत माहिती असेल.” प्रत्येक जाहिरात ही कॉईनस्विच कुबेर प्लॅटफॉर्मचे वेगळे वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी डिझाइन केलेली आहे, असे त्यात म्हटले आहे.

कॉईनस्विच कुबेरचे, सह-संस्थापक आणि सीईओ आशिष सिंघल म्हणाले, “आमच्या कुछ तो बदलेगा मोहिमेत रणवीर सिंगला दाखवून आम्ही टियर 2 आणि टियर 3 शहरात प्रसिद्धी करत आहोत. आम्हाला सर्व भारतीयांना क्रिप्टो स्पेसमध्ये असलेल्या संधीची आणि गुंवतणुकीसाठी एका सहजसाध्य पर्यायाच्या उपलब्धतेची जाणीव करुन द्यायची आहे.”

याबद्दल बोलताना, अभिनेता रणवीर सिंह म्हणाला, “भारतातील क्रिप्टो इंडस्ट्रीसाठी हा एक महत्वाचा काळ आहे. भारताचा सर्वात मोठा क्रिप्टो ॲसेट प्लॅटफॉर्म कॉईनस्विच कुबेरचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करण्याचा आनंद आहे.”

तो म्हणाला, “कंपनी भारतातील क्रिप्टो क्रांतीमध्ये एक प्रमुख प्लेअर आहे आणि मी त्यांच्या प्रवासाचा एक भाग बनल्याचा मला आनंद आहे.”

कंपनीने 6 ऑक्टोबर रोजी नवीन गुंतवणूकदार कॉइन बेस वेंचर्स आणि सिलिकॉन व्हॅली फंड अँडरसन होरोवित्झ यांच्या नेतृत्वाखाली 260 मिलियन डॉलर्सची उभारणी केली आहे आणि सहा महिन्यांत त्याचे मूल्य चार पटीने वाढून 1.9 अब्ज डॉलर्स एवढे झाले आहे. कॉईनस्विच कुबेरची स्थापना 2017 मध्ये आशिष सिंघल, गोविंद सोनी आणि विमल सागर तिवारी यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे जागतिक एग्रीगेटर म्हणून केली होती. जून २०२० मध्ये कंपनीचे ४५ लाख वापरकर्ते होते.

 

Comments are closed.