कोण म्हणतं मोदी सरकार काही करत नाही? फक्त ३३० रुपयांत सरकार देतेय २ लाखांचं कव्हर
Everything you need to know about Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana
करोनामुळे गेल्या काही महिन्यांत देशभरात थैमान घातले आहे. विशेषतः करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सबंध देशाला मोठा फटका बसला. या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सातत्याने समोर आले आहे. असे असताना सर्वांनाच लाईफ इंश्युरन्स म्हणजेच जीवन विम्याचे महत्व पटू लागले आहे. आपल्यामागे कुटूंबियांना थोडीतरी आर्थिक मदत व्हावी म्हणून जीवन विमा विकत घेण्याकडे कल वाढू लागला आहे.
मात्र अनेकांना खाजगी इंश्युरन्स कंपन्यांचे हफ्ते महाग वाटतात. बरेच जण हेहफ्ते जास्त असल्याने जीवन विमा घेण्याचे रद्द करतात. अशा सर्वांसाठी एक पॉलिसी आहे ती म्हणजे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना. ही एक टर्म पॉलिसी असून पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना २ लाख रुपये मिळतात. हे सगळे फक्त वर्षाला ३३० रुपयांचा हफ्ता भरून. ह्या पॉलिसीचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते.
तुमचे वय १८-५० च्या दरम्यान असल्यास आणि तुमचे बँक अकाऊंट असल्यास तुम्ही ही पॉलिसी घेण्यासाठी पात्र ठरता. देशभरातील जवळपास १००० हून अधिक बँका आपल्या शाखांमधून ही पॉलिसी उपलब्ध करून देतात. तुम्हाला फक्त हफ्त्याची रक्कम म्हणजे ३३० रुपये तुमच्या अकाऊंटमधून ऑटो डेबिट करण्यासाठी बँकेला परवानगी द्यावी लागते. दरवर्षी ३१ मे ला तुमच्या अकाऊंटमधून या पॉलिसीच्या हफ्त्याची रक्कम ३३० रुपये वजा केले जातात आणि १ जून रोजी या पॉलिसीचे नूतनीकरण होते. ही पॉलिसी घ्यायची असल्यास तुम्ही तुमचे अकाउंट असलेल्या बँकेत एक अर्ज भरून देऊ शकता. अनेक बँका अगदी एसएमएसद्वारेसुद्धा ही पॉलिसी घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात.
या पॉलिसीची क्लेम सेटलमेंट प्रक्रियासुद्धा सोपी आहे.
ज्या बँकेत मृत पॉलिसीधारकाचे अकाऊंट असेल त्या बँकेत खालील कागदपत्रे सुपूर्द करावी लागतात.
१. पूर्ण भरलेला क्लेम फॉर्म
२. डिस्चार्ज रिसीट
३. डेथ सर्टिफिकेट
४. कॅन्सल्ड चेकची झेरॉक्स
तुम्ही बँकेला ही कागदपत्रे सुपूर्द केल्यानंतर ती ३० दिवसांच्या आत इंश्युरन्स कंपनीला पाठवणे बँकेला बंधनकारक असते. हा इंश्युरन्स क्लेम आल्यावर सर्व बाबींची पूर्तता झालेली असल्यास इंश्युरन्स कंपनीला हा क्लेम ३० दिवसांत सेटल करावा लागतो.
ही सरकारी पॉलिसी आहे असे वाटून अनेकजण ही पॉलिसी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला पैसे मिळणार नाहीत असे अनेकांना वाटते. मात्र जनसुरक्षा पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये या योजनेत १०.२७ कोटी नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. यापैकी २,५०,३६१ पॉलिसीधारकांचे क्लेम सेटलमेंटसाठी मिळाले होते आणि २,३४,९०५ क्लेम सेटल करण्यात आले आहेत. म्हणजेच जवळपास ९३% क्लेम सेटल झाले आहेत.
Comments are closed.