बँकेने ऑनलाईन व्यवहारांसाठी डेबिट कार्ड बंद केलंय? हे आहे कारण
Banks have disabled debit cards as per RBI guidelines
तुम्ही बरेच दिवस तुमचे डेबिट कार्ड वापरले नसल्यास ते बंद केले आहे असा मेसेज किंवा ईमेल आला आहे का? गेल्या काही दिवसांत अनेक जणांना त्यांच्या बँकेकडून डेबिट कार्ड बंद केल्याचे मेसेज किंवा ईमेल आले आहेत. बँकांनी मात्र आपला हा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या नियमाला अनुसरून असल्याचे स्पष्ट केले आहे.
बँकांनी ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये खालील मेसेज आहे.
“तुम्ही तुमचे डेबिट कार्ड गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन पेमेंट किंवा कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी वापरलेले नाही. कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून आरबीआयच्या आदेशानुसार तुमच्या कार्डवर ऑनलाईन पेमेंट किंवा कॉन्टॅक्टलेस पेमेंटच्या सुविधा १० दिवसांत बंद होतील.” ही कार्ड बंद करण्यामागे ग्राहकांचे हित जपणे हाच हेतू आहे असे बँकांनी स्पष्ट केले आहे. यातून कार्डचा कुठल्याही चुकीच्या व्यवहारांसाठी उपयोग होणार नाही.
एटीएममधून पैसे काढता येणार का?
हो. कार्ड फक्त ऑनलाईन पेमेंट्ससाठी बंद करण्यात आली आहेत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड वापरण्यावर कुठलाही परिणाम होणार नाही.
कार्ड बंद झाल्यास काय करायचे?
बँकेने तुमचे कार्ड बंद केले तरी काळजी करण्यासारखे काहीही नाही. तुम्ही नेटबँकिंगद्वारा ऑनलाईन पेमेंटसाठी कार्ड पुन्हा सुरु करू शकता. यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
Comments are closed.