‘आज गुंतवलेली कमाई देणार उद्या दुप्पट मलाई’, पण कसं ? सारं ‘ह्या’ स्पेशालिटी केमिकलच्या स्टॉकमध्ये दिसं…
This speciality chemical company is perfectly positioned for growth in upcoming years
ज्युबीलीयंट इंग्रेव्हीया ही एक स्पेशालिटी केमिकल्स बनवणारी कंपनी आहे. यासोबत कंपनी ऍनिमल न्यूट्रिशन आणि हेल्थ सोल्युशन्स बिझनेसमध्ये देखील सक्रिय आहे. कंपनीचे प्रॉडक्ट्स फार्मा, ऍनिमल न्यूट्रिशन, ह्युमन न्यूट्रिशन, पर्सनल अँड कन्झ्युमर केअर यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये वापरले जातात.
कंपनीच्या एकूण सेल्सपैकी ३२% स्पेशालिटी केमिकल्समधून, १८% न्यूट्रिशन अँड हेल्थ सोल्युशनमधून तर ५०% सेल्स लाईफ सायन्स केमिकल्समधून येतो. आता यातही एक गंमत आहे. हे तिन्ही सेगमेंट एकमेकांशी निगडित आहेत आणि व्हर्टीकली इंटिग्रेटेड आहेत. कसे? तर लाईफ सायन्स केमिकल्स बिझनेझच्या एकूण २५% व्हॉल्युम हा स्पेशालिटी केमिकल्स डिव्हिजनकडून वापरला जातो. कंपनीच्या पायरीडीन आणि पिकोलाईनचा एकूण ४५% व्हॉल्युम हा स्पेशालिटी केमिकल्स डिव्हिजनच्या प्रॉडक्ट्समध्ये वापरला जातो. तर न्यूट्रिशन अँड हेल्थ सोल्युशन्स डिव्हिजनकडून व्हिटॅमिन बी३ साठी बीटा पिकोलीन चा वापर हा १००% इनहाउस होऊन ते स्पेशालिटी केमिकल्स डिव्हिजनकडून पुरवले जाते.
या प्रत्येक डिव्हिजनचा स्वतःचा असा वेगळा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आहे.
स्पेशालिटी केमिकल्स –
– ७० प्रॉडक्टसचा पोर्टफोलिओ
– पायरीडीन बीटाचे उत्पादन करणाऱ्या जगातील टॉप २ कंपन्यांपैकी एक
– पायरीडीन डेरीव्हेटीव्ह्जमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर
– जगभरात ४२० हुन अधिक कस्टमर्स
– पायरीडीनचे सर्वात कमी किंमतीत प्रॉडक्शन करणारी कंपनी, यामुळे इतर कंपन्यांना या क्षेत्रात शिरकाव करण्यास अवघड
– एखाद्या कंपनीने तरीही हे धाडस करायचे ठरवले तरी वेगवेगळे अप्रूव्हल्स घेण्यासाठी लागणारा कालावधी ३-५ वर्षे एवढा दीर्घ आहे.
न्यूट्रिशन अँड हेल्थ सोल्युशन्स –
– ३४ प्रॉडक्टसचा पोर्टफोलिओ
– व्हिटॅमिन बी३ साठी जगातील टॉप २ कंपन्यांपैकी एक
– भारतीय बाजारपेठेत व्हिटॅमिन बी४ साठी पहिल्या क्रमांकावर
– जगभरात ४०० हुन अधिक कस्टमर्स
– ऍनिमल न्यूट्रिशन अँड हेल्थसाठी लागणारे १८ हून अधिक प्रॉडक्टस
– यासाठी शेतकरी वर्गात लोकप्रियता
लाईफ सायन्स केमिकल्स
– ६ प्रॉडक्टसचा पोर्टफोलिओ
– असेटिक अनहायड्रॉइडमध्ये जगातील टॉप २ कंपन्यांपैकी एक
– इथील ऍसिटेट बनवणारी अग्रगण्य कंपनी
– जगात सर्वाधिक बायोबेस्ड ऍसिटाल्डिहाइड बनवणारी कंपनी
– जगभरात ६०० हुन अधिक कस्टमर्स
कंपनीच्या प्रॉडक्टसचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो हा कंपनीसाठी मोठा फायदा आहे. जसे ६० हुन अधिक एपीआय आणि १६ ऍग्रो टेक्निकल्स मध्ये कंपनीचे प्रॉडक्टस वापरले जातात. म्हणजे मिळणारा रेव्हेन्यू हा वेगवेगळ्या क्षेत्रातून असल्याने एक प्रकारे रिस्क कमी आहे. कंपनी ५० हून अधिक देशांत व्यवसाय करते. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतून मागणी येते. कंपनीचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी २ तर उत्तर प्रदेशमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत. याशिवाय गुजरातमध्ये एक तर उत्तर प्रदेशात दोन आर अँड डी सेंटर्सदेखील आहेत. कंपनीकडे एकूण ९० सायंटिस्ट्स असून त्यातले २० जण पीएचडी धारक आहेत. कंपनीच्या लॉन्ग टर्म स्ट्रॅटेजी ठरवताना प्रमोटर्सस्वतः जातीने लक्ष घालतात. कंपनीच्या लीडरशिप टीमचा सरासरी अनुभव ३० वर्षे एवढा प्रदीर्घ आहे.
येणाऱ्या ३-४ वर्षात कंपनी तब्बल ६० नवे प्रॉडक्ट्स लाँच करणार आहे. कंपनीचे जगभरातील कस्टमर्स इतर देशांतील महाग प्रॉडक्ट्स घेण्यापेक्षा भारतातील कंपनीकडून त्याच दर्जाची प्रॉडक्ट्स घेण्याकडे वळत आहेत. याशिवाय अनेक देश चीनला पर्याय म्हणून भारताचा विचार करू लागले आहेत.
कंपनीला येणाऱ्या काळात कोणत्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो?
१. येणाऱ्या काळात भारत स्पेशालिटी केमिकल्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सरकार त्यासाठी विविध पावले उचलत आहे.
२. भारतातील हर्बीसाईड्स, इन्सेक्टीसाईड्स आणि फंगीसाईड्सचे मार्केट अतिशय छोटे आहे. या घटकांचा भारतातील वापर ०.६ किलो प्रति हेक्टर इतका अत्यल्प आहे. हाच वापर चीनमध्ये १३ किलो तर अमेरिकेत ७ किलो एवढा आहे.
३. कोव्हीडच्या दोन लाटा आल्यानंतर ह्युमन न्यूट्रिशन अँड हेल्थ सोल्युशन्स या डिव्हिजनला आपला बिझनेस वाढविण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
४. येणाऱ्या काळात कंपनी ९०० कोटी रुपये कॅपेक्सवर खर्च करणार आहे.
मार्च २०२१ अखेरीस संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या सेल्समध्ये ३१%, प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये ९८% वाढ झाली. याच वर्षात कंपनीने ग्रॉस डेट ७४७ कोटींनी कमी झाले. कंपनीच्या प्रमोटर्सकडे एकूण ५१% शेअर्स असून यातील ०% शेअर्स प्लेज केलेले आहेत. राकेश झुनझुनवाला आणि यांची पत्नी या दोघांचा मिळून कंपनीत ६% हून अधिक स्टेक आहे. नुकताच कंपनीचा इन्व्हेस्टर कॉल पार पडला होता. या कॉलवर व्हाईट ओक कॅपिटल, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, मॅक्वायर यांसारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबतच मोतीलाल ओसवाल, युटीआय म्युच्युअल फ़ंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इंश्युरन्स ऍक्सिस म्युच्युअल फंड यांच्यासारखे भारतातील आघाडीचे गुंतवणूकदारसुद्धा उपस्थित होते.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून या शेअरचा विचार करायला काहीच हरकत नाही.
टेक्निकल ॲनालिसिस
डेली चार्टवर स्टॉक अपट्रेंडला आहे. पण मागील काही दिवसांपासून स्टॉकला ८००-८१० ही लेव्हल क्रॉस करण्यात अडचण येत आहे. स्टॉक जर पुढील काही दिवसात या लेव्हलच्या वर क्लोझ देऊ शकला तर लवकरच हा स्टॉक चार आकडी लेव्हल ला पोहोचू शकतो.
Comments are closed.