SBI ने कमालच केली, आता थेट पाण्यावर तरंगणारे एटीएम 

This will be one of kind ATM in India

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने अलीकडेच श्रीनगरमधील ‘दाल सरोवर’ येथे फ्लोटिंग एटीएम म्हणजेच पाण्यावर तरंगणारे एटीएम सुरु केले आहे.  एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी या एटीएमचे उद्घाटन झाले. एसबीआयने म्हटले आहे की लोकप्रिय दाल सरोवरातील फ्लोटिंग एटीएम तेथील अनेक गरजा पूर्ण करेल,आणि श्रीनगरमध्ये एक आकर्षण ठरेल.

याबाबत एसबीआयने ट्विट करून माहितीची दिली आहे. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,
‘एसबीआयने स्थानिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी श्रीनगर येथे हाऊसबोटवर एक एटीएम सुरु केल. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी त्याचे उद्घाटन झाले. लोकप्रिय दाल सरोवरातील फ्लोटिंग एटीएम एक दीर्घकालीन गरज पूर्ण करेल आणि श्रीनगरच्या पर्यटनाचे आणखी एक आकर्षण होईल.’

जम्मू-काश्मीरच्या भेटीदरम्यान, खारा यांनी जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची राजभवनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी एसबीआय जम्मू-कश्मीरमध्ये राबवत असलेल्या ताज्या उपक्रमांची माहिती लेफ्टनंट गव्हर्नर यांना दिली. खारा यांनी सिन्हा यांच्याशी जम्मू काश्मीरमधील नागरिकांना देता येतील अशा बँकेच्या विविध आगामी आर्थिक सेवांबाबतसुद्धा चर्चा केली.

Comments are closed.