श्रीराम एएमसीतर्फे भारताची पहिली मल्टी सेक्टर रोटेशन फंड योजना सादर

श्रीराम समूहाच्या श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने, श्रीराम मल्टी सेक्टर रोटेशन या नवीन म्युच्यूअल फंडाचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. म्युच्यूअल फंड उद्योगातील हा अशा प्रकारचा पहिला फंड आहे. सक्रियपणे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या या फंडाच्या इक्विटी पोर्टफोलिओआधारे मध्यम ते दीर्घकाळात भांडवलाची वृध्दी करणे, हा उद्देश आहे. उत्तम कामगिरी करत असलेल्या आणि चटकन लक्षात येणाऱ्या क्षेत्रांत रोटेशन पध्दतीने म्हणजेच फिरत्या पध्दतीने या फंडाचा पोर्टफोलिओ आकारास येणार आहे. निराशाजनक कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांमधील गुंतवणूक कमी करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांमधील संधी हेरण्यासाठी क्षेत्रनिहाय फिरत्या गुंतवणूक पध्दतीचा लाभ उठविणे, ही या फंडाची रणनीती आहे.

फंडाचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन

क्षेत्रांच्या सापेक्ष गतीनुसार किमान 3 ते 6 आघाडीच्या (ट्रेंडिंग) क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणे आणि संबंधित क्षेत्र कमकुवत पडण्याचे संकेत मिळताच त्यामधून बाहेर पडणे, हे या फंडाचे लक्ष्य असणार आहे. श्रीराम एएमसीने स्वतः विकसित केलेल्या एन्हांस्ड क्वांटामेंटल इन्व्हेस्टमेंट (इक्यूआय) फ्रेमवर्क आधारे क्षेत्रांची गुंतवणूकीसाठी निवड केली जाईल. परिमाणात्मक घटकांआधारे या आघाडीच्या क्षेत्रांची निवड केली जाईल. अशा प्रकारे निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रांच्या अंतिम निवडीपूर्वी ढोबळ आर्थिक निकष, गुंतवणूक निर्देशक, बाजाराची धारणा, किंमती आदी मूलभूत घटकांआधारे त्यांची तपासणी केली जाईल. संबंधित क्षेत्रांमध्ये केव्हा फेरबदल करायचे, हे ठरविण्यास हा दृष्टीकोन उपयुक्त ठरणार आहे. एखाद्या क्षेत्रातील गुंतवणूक मर्यादेसह अंतिम क्षेत्र निवड आणि त्यातील गुंतवणूकीत वेळोवेळी बदल करण्याचा निर्णय निधी व्यवस्थापकाला राहणार आहे. शिखर ते तळ पध्दतीनुसार क्षेत्र निवडले गेल्यावर, प्रत्येक क्षेत्रामधील तळपातळीवर असलेले समभाग इक्यूआय धोरणाद्वारे गुंतवणूकीसाठी निवडले जातील. पोर्टफोलिओची बांधणी आणि पुनर्संतुलनाचा अंतिम निर्णय हा फंड व्यवस्थापकच घेतील. श्रीराम मल्टी सेक्टर रोटेशन फंड ज्या क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रित करेल, त्याबद्दल गुंतवणूकदारांना माहिती होण्यासाठी मासिक फंड फॅक्ट शीटमध्ये याबाबतची माहिती वेळोवेळी प्रकाशित केली जाणार आहे.

श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ कार्तिक एल. जैन म्हणाले, “सल्लागारांच्या अभिप्रायावरून असे दिसून येते की, जेव्हा गुंतवणूकदार स्थूल-आर्थिक चक्र किंवा धोरणातील बदलांमुळे प्रकाशझोतात येत असलेल्या उभरत्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात आणि ते अनेकदा ‘सेक्टर ट्रॅप्स’मध्ये अडकून पडतात. त्यांच्या पोर्टफोलिओला उसळीचा फायदा होत असताना, जडत्व किंवा वर्तणुकीशी संबंधित पूर्वाग्रहांमुळे कल बदलला किंवा तो सपाट झाला तरीही ते आपली गुंतवणूक त्यातच कायम ठेवतात. याचा परिणाम म्हणजे त्यांना अल्प किंवा अगदी नकारात्मक वार्षिक परतावा मिळू शकतो. याउलट , जर त्यांनी त्यांचे क्षेत्र वाटप वेळेवर केले असते, तर त्यांना फायदा झाला असता. गुंतवणूकदारांना सहन कराव्या लागणाऱ्या या गुंतवणूकरुपी वेदना बिंदूकडे लक्ष देणे, हे श्रीराम मल्टी सेक्टर रोटेशन फंडाचे उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना सेक्टर ट्रॅप टाळण्यात मदत होईल आणि त्याऐवजी, वेळेनुरुप एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक फिरवून क्षेत्राच्या प्रवाहावर गुंतवणूकदारांना स्वार होता येईल. आमची कॅचलाइन ‘जैसा सेक्टर ट्रेंड, वैसा आपला पोर्टफोलिओ’ याच सार स्पष्ट करते. फंड व्यवस्थापक योजनेतील सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा निधी पुनर्संतुलित करतो तेव्हा भांडवली नफा कर लागू होत नसल्याने हा फंड गुंतवणूकदारांसाठी कराच्या दृष्टीकोनातून अतिशय कार्यक्षम आहे.”

श्रीराम एएमसीचे वरिष्ठ फंड व्यवस्थापक दिपक रामराजू म्हणाले, “संबंधित प्रवाहानुसार प्रथम क्षेत्राची निवड आणि त्यानंतर समभागांची निवड या आमच्या द्विस्तरीय पध्दतीमुळे आमचा फंड त्याच्या नावानुसारच काम राहतो, याची हमी देतो. आम्ही स्वतः विकसित केलेल्या एन्हांस्ड क्वॉन्टामेंटल इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क आधारे क्षेत्रनिहाय फिरती गुंतवणूक आणि समभागांची निवड यातून ठराविक कालावधीत गुंतवणूकदारांना सातत्यपुर्ण अल्फा परतावा प्रदान करणे, हे आमचे उद्दीष्ट आहे.”

गुंतवणूकीचे पर्याय:

गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक आणि कौटुंबिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी श्रीराम ओव्हरनाईट फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP), टॉप-अप्स किंवा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन्स (STP) याद्वारे नियमितपणे या फंडात गुंतवणूक करू शकतात. एकरकमी किंवा एसआयपीसाठी किमान गुंतवणूक रक्कम ₹ 500 आहे. यात कोणताही विशिष्ट मुदतीचा (लॉक-इन) कालावधीचे बंधन नाही. एसआयपीची वारंवारता साप्ताहिक, पाक्षिक, मासिक किंवा त्रैमासिक असू शकते. एकदा पुरेसा निधी संकलित झाल्यानंतर, गुंतवणूकदार स्वतःला नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी समान वारंवारतेआधारे पद्धतशीर पैसे काढण्याची योजना (SWP) कार्यान्वित करू शकतात. गुंतवणूकदार https://shrifunds.shriramamc.in वर ShriFunds पोर्टलद्वारे सुरक्षित मार्गाने सर्व श्रीराम म्युच्युअल फंडमधील त्यांची गुंतवणूक ऑनलाइन पध्दतीने खरेदी करु शकतात, तसेच व्यवस्थापितही करू शकतात.

गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षात १.२५ लाख रुपयांचा भांडवली नफा मिळविल्यास हा फंड १२.५% (अधिक अधिभार आणि उपकर) लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (एलटीसीजी) चा लाभ मिळवून देतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपले क्षेत्रनिहाय निधी वाटपाचे संतुलन राखण्यासाठी कोणत्याही सेक्टर फंडातील त्यांची गुंतवणूक काढून घेतली तर, त्यांना प्रत्येक व्यवहारासह भांडवली नफा कराचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा निधी व्यवस्थापक योजनेमध्ये व्यवहार करतात तेव्हा, योजनेवर कोणताही भांडवली नफा कर लागू होत नाही. जे गुंतवणूकदार आघाडीच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करु इच्छितात, त्यांच्यासाठी हा फंड या दोन पैलूंमुळे कर-कार्यक्षम गुंतवणुक पर्याय बनला आहे.

श्रीराम ग्रुपने अमेरिका-आधारित मिशन1 इन्व्हेस्टमेंट्स एलएलसीला धोरणात्मक भागीदार बनवत आपल्या म्युच्युअल फंड व्यवसायाला पुन्हा ऊर्जा दिली आहे. श्रीराम एएमसीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता आणताना ग्राहकांसाठी पुरक आणि विभिन्न प्रकारचे गुंतवणूक पर्याय आणले आहेत. शाश्वत वाढीचा पाया रचण्यासाठी एएमसी ‘कामगिरी, उत्पादने आणि गुंतवणूक ’ यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे.

Comments are closed.