एलआयसीचा नफा काय सांगतो?

आयपीओ येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या एलआयसीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत एलआयसीला २३५ कोटींचा नफा झाला आहे. हाच नफा आर्थिक वर्ष २०२१ च्या तिमाहीत ९४ लाख रुपये होता. हा प्रॉफिट इतका का वाढला?

एलआयसीने आपली प्रॉफिट शेअरिंग पॉलिसी नुकतीच बदलली. म्हणजे नक्की काय केलं? आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत एलआयसीचा एक पोलिसहोल्डर्स फंड होता. या फंडातला ९५% वाटा पॉलिसीहोल्डर्समध्ये वाटला जाई तर ५% वाटा शेअरहोल्डर्ससाठी असे. प्रायव्हेट कंपन्या ९०% वाटा पॉलिसीहोल्डर्सला तर १०% वाटा शेअरहोल्डर्ससाठी ठेवतात.

 

आता एलआयसीचा आयपीओ येणार आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरहोल्डर्सची संख्या वाढणार आहे. मग ही प्रॉफिट शेअरिंग सिस्टीम रिटेल शेअरहोल्डर्ससाठी योग्य ठरली नसती. त्यामुळे एलआयसीने कायद्यात बदल करून आपली नवी प्रॉफिट शेअरिंग सिस्टीम अस्तित्वात आणली. यामुळे पॉलिसीहोल्डर्स आणि शेअरहोल्डर्समधील प्रॉफिट शेअरिंगचे सध्याचे ९५-५ गुणोत्तर बदलून २०२३ आणि २०२४ वर्षात ९२.५- ७.५, तर २०२५ मध्ये ९०-१० असे होईल.

 

आता एलआयसीचा हा प्रॉफिटचा आकडा कंपनीबद्दल योग्य माहिती देतोच असे नाही. सहसा लाईफ इन्श्युरन्स कंपन्यांचे मूल्यांकन हे ‘व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस’ म्हणजेच VNB च्या बेसिसवर करतात.

ही VNB म्हणजे काय?
एखाद्या वर्षात जो नवीन बिझनेस आला त्यामुळे भविष्यात होणाऱ्या नफ्याची आत्ताची व्हॅल्यू. म्हणजे VNB म्हणजे एक प्रकारे लाईफ इन्श्युरन्स कंपन्यांचे EPS आहे असे म्हटले तरी चालेल. एलआयसीने डिसेंबरअखेर आपली NVB किती आहे हे जाहीर केलेले नाही.

मात्र या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांची आकडेवारी एलआयसीने प्रसिद्ध केली आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत एलआयसीचा NVB मार्जिन ९.२% होता. इतर प्रायव्हेट कंपन्याच्या तुलनेत एलआयसीची आकडेवारी कशी आहे?

एलआयसी – ९.३%
एसबीआय लाईफ – २१.८%
एचडीएफसी लाईफ – २६.४%
आयसीआयसीआय प्रुडेंशियल – २७.३%

एलआयसीच्या VNB मार्जिनची व्हॅल्यू येणाऱ्या काळात निश्चितच वाढू शकते.

एलआयसीची प्रॉफिटॅबिलीटी कमी असण्याचे एक कारण म्हणजे कंपनीचे प्रॉडक्ट मिक्स. एलआयसी कायमच इन्श्युरन्स प्रॉडक्टस हे इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्याला एंडोमेंट प्लॅन असेही म्हटले जाते ते विकत आली आहे. हेच जर प्रायव्हेट कंपन्यांचा विचार केला तर त्या कायम प्युअर प्रोटेक्शन प्लॅन्स जास्त प्रमाणात विकत आल्या आहेत. या प्लॅन्सचे मार्जिन तुलनेने जास्त असते. एलआयसीने भविष्यात प्युअर प्रोटेक्शन प्लॅन्स विकण्यावर भर दिला तर त्यांचे VNB मार्जिन सुधारण्यास मदत होऊ शकते.

एलआयसीची टॉप लाईन ग्रोथ गेल्या दोन वर्षात प्रायव्हेट प्लेयर्सच्या तुलनेत कमी आहे. एलआयसी आपल्या एजंट्सवर बिझनेससाठी अवलंबून असते हे त्यामागचे कारण आहे. याउलट प्रायव्हेट प्लेयर्सने गेल्या दोन वर्षात आपले डिजिटल चॅनेल्स मजबूत करण्यावर जास्त भर दिला आहे.

 

एलआयसीनेदेखील आपला डिजिटल रिच वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. पण त्याचे फायदे समजण्यासाठी काही काळ जावा लागेल. सध्यातरी वर मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करता प्रायव्हेट प्लेयर्सच्या तुलनेत एलआयसी काहीशी मागे आहे असे म्हणायला हरकत नाही.

Comments are closed.