तब्बल १९ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिलेला ‘हा’ शेअर तीन आकडी टप्पा गाठणार का?
बाजारात गेल्या दोन तीन दिवसांपासून एका स्मॉल कॅप शेअरचा बोलबाला आहे. हा शेअर म्हणजे मोरपेन लॅब. १९८४ साली स्थापन झालेली मोरपेन लॅबोरेटरीज ही कंपनी अचानक एवढी चर्चेत का आली? त्याला काय कारणे आहेत?
सगळ्यात पहिले कारण म्हणजे मोरपेन लॅबचे मागील एका आठवड्यात १५२ मिलियन एवढे शेअर्स ट्रेड झाले.म्हणजेच एवढ्या शेअर्सची देवाण घेवाण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे कंपनीमध्ये स्वित्झर्लंडच्या कॉरिंथ ग्रुपने जवळपास ७५० कोटीची गुंतवणूक केली आहे.
या दोन बातम्यांचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसला. या शेअरने तब्बल १९ वर्षानंतर ५० रुपयांचा टप्पा पार करत आता ब्रेकआऊट दिला आहे.
मोरपेन लॅबचे प्रॉडक्ट्स नक्की काय आहेत?१९ वर्षानंतर असे काय घडले ज्यामुळे कंपनीचा शेअर थेट ५० रुपयांच्या वर आला आहे? याबद्दल आपण थोडे जाणून घेऊ.
कंपनीचे प्रॉडक्ट्स – कंपनी तीन वेगवेगळ्या व्हर्टीकल्स आपले प्रॉडक्ट्स विकते.
तसेच या कंपनीने आता नवीन मॉलेक्युल आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करत जागतिक स्तरावर ॲक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्सच्या (एपीआय) बिझनेस मध्ये आपले लक्ष वळवले आहे. नवीन मॉलेक्युलची मदत मधुमेह, अँटी-हायपरटेन्सिव्ह, कोलेस्टेरॉल कमी करणारे आणि न्यूरो-सायकायट्रिक या रोगांवरील औषधांसाठी होणार आहे. या मोलेक्युलवरसुद्धा विविध प्रयोग होत आहेत आणि ते पुढील २४ ते ३६ महिन्यांमध्ये वापरात येतील.
२०२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा १२०% ने वाढला (१०.८२ कोटी ते २३.८० कोटी) आहे. याच काळात कंपनीचा महसूल ३२% ने वाढला (२३४.६६ कोटी ते ३१०.२६ कोटी) आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ६१% एपीआय, २७% डायग्नोस्टिक डिव्हायसेस आणि १२% हा फॉर्म्युलेशन बिझनेसमधून मिळतो.
या कंपनीचा चार्ट पाहताना असे लक्षात येते की कंपनीच्या शेअरने सप्टेंबर २००२ नंतर एकदा पण ४५ रुपयांचा टप्पा पार केला नव्हता. त्यामुळे ४५ हा आकडा एक प्रकारे रेझिस्टन्स म्हणून काम करत होता. पण एप्रिल २०२१ मध्ये शेअरने ४५ चा टप्पा ओलांडत १९ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिला आहे. तसेच ज्या दिवशी ब्रेकआऊट झाला त्या दिवसाचा व्हॉल्युम ५ कोटीपेक्षा जास्त असल्याने हा ब्रेक आऊट सुद्धा फेल जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच आज या शेअरची मंथली क्लोजिंग ६५ रुपयांवर झाली आहे जी ४५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा शेअर तीन आकडी किंमतीचा टप्पा गाठू शकतो. या शेअरचा ऑल टाइम हाय २२२ रुपये आहे.
Comments are closed.