आमच्या विषयी

‘पैसापाणी’ ही शेअर बाजार आणि इतर अर्थविषयक घडामोडींची अद्ययावत माहिती देणारी भारतातील पहिली मराठी वेबसाईट आहे. या वेबसाईटची स्थापना २०२१ मध्ये झाली आहे.

शेअर बाजार आणि मराठी माणूस यांचं नातं तितकंसं जवळचं नाही. अनेक मराठी लोक शेअर बाजारापासून लांब रहाणे पसंत करतात. ‘पैसापाणी’ च्या माध्यमातून याच लोकांना शेअर बाजाराविषयी सोप्या, कळेल अशा शब्दांत माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यामध्ये विविध कंपन्यांच्या शेअरचे सोप्या भाषेत विश्लेषण, त्यांच्या तिमाही आणि वार्षिक निकालांचे कंपनीच्या वाटचालीवर होणारे परिणाम, विविध स्टार्टअप्स विषयी माहिती, वेगवेगळे चार्ट पॅटर्न या विषयांशी निगडित माहिती दिली जात आहे.

आर्थिक क्षेत्रातील नवनवीन घडामोडी सोप्या भाषेत मराठी वाचकापर्यंत पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे.

आम्ही सेबी रजिस्टर्ड नाही. आमचा उद्देश फक्त शेअर बाजारासंबंधी माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. आम्ही कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही किंवा निगडित उत्पादने विकत नाही.

Join Telegram channel – https://t.me/paisapani