भारतावर मोठा विश्वास! Amazonचे आशियातील दुसरे सर्वात मोठे ऑफिस बेंगळुरूमध्ये
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाणारी अमेझॉन (Amazon) कंपनी 23 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूच्या बाहेरील कट्टीगेनाहल्ली येथे आशियातील दुसरे सर्वात मोठे ऑफिस उघडले आहे. 11 लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले, तसेच, 12 मजली कॅम्पस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. या कार्यालयात ई-कॉमर्स, ऑपरेशन्स, पेमेंट्स, तंत्रज्ञान आणि विक्रेता सेवा यासारख्या विभागांमधील 7,000 हून अधिक कर्मचारी काम करणार आहेत.
कंपनी 2030 पर्यंत आणखी 3.20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.
बेंगळुरू मधील हे नवीन अॅमेझॉन कॅम्पस अंदाजे 5 एकर जमिनीवर उभारले जाणार आहे. अमेझॉनने जागतिक व्यवहार आणि कायदेशीर अधिकारी डेव्हिड झापोल्स्की म्हणाले की, तंत्रज्ञान स्वीकारण्याची भारताची गती आणि एआयसाठीचा उत्साह जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा वेगळा आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, Amazon ने आतापर्यंत भारतातील त्यांच्या सर्व व्यवसायांमध्ये 40 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.60 लाख कोटी रुपये) गुंतवणूक केली. तर, कंपनी 2030 पर्यंत अतिरिक्त 35 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.20 लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे.
Amazon Now आता जगभरातील इतर देशांमध्येही पोहोचेल.
शिवाय, डेव्हिड झापोल्स्की म्हणाले की, भारतातील जलद गती असलेल्या शहरांसाठी डिझाइन केलेले क्विक कॉमर्स आउटलेट, ‘अमेझॉन नाऊ’ खूप यशस्वी झाले आहे. कंपनी आता या भारतीय मॉडेलचा मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, युरोप आणि लॅटिन अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या विचारात आहे.
यावेळी, कर्नाटकचे उद्योग मंत्री एम.बी. पाटील हे देखील कॅम्पस उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. ते म्हणाले की, बेंगळुरूमध्ये अमेझॉनची सततची गुंतवणूक जागतिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन केंद्र म्हणून भारताची वाढती ताकद दर्शवते आहे.
पुढे ते म्हणाले की, अशा मोठ्या कॅम्पसमुळे केवळ रोजगारच नाही तर स्थानिक परिसंस्था आणि देशाची डिजिटल अर्थव्यवस्था देखील मजबूत होते.
आशियातील अमेझॉनचे सर्वात मोठे कार्यालय कोठे आहे?
अॅमेझॉनचे आशिया आणि जगातील सर्वात मोठे कार्यालय हैदराबाद मध्ये आहे. 2019 मध्ये उघडलेले हे कॅम्पस 9.5 एकर जागेवर पसरलेले आहे आणि त्यात अंदाजे 15,000 कर्मचारी काम करतात.
Comments are closed.