Bharat Taxi: ड्रायव्हर नव्हे, आता तुम्हीच मालक!” अमित शाह यांची घोषणा

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Union Home and Cooperation Minister Amit Shah) यांनी आज नवी दिल्ली मध्ये भारत टॅक्सी (Bharat Taxi) चालकांशी संवाद साधला. यावेळी चालकांना आदराने “सारथी” असे त्यांनी संबोधले. अमित शहा यांच्याशी हा खास संवाद सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यक्रमादरम्यान, शाह यांनी टॅक्सी चालकांचे अनुभव ऐकले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या नवीन, सहकारी-आधारित गतिशीलता मॉडेलच्या भविष्यातील दृष्टिकोनावर त्यांच्याशी चर्चा देखील केली.

‘सारथी हेच मालक’ ची संकल्पना:

शाह यांनी संवादादरम्यान स्पष्ट केले की, भारत टॅक्सीचा (Bharat Taxi) मुख्य उद्देश केवळ कर्मचारी हा कर्मचारी न ठेवता नसून ते व्यवसायाचे मालक बनतील हा आहे.

थेट नफा वितरण:

खाजगी कॅब एग्रीगेटर्स जसे की ओला, उबर, इ. च्या विपरीत, भारत टॅक्सी “शून्य-कमिशन” आणि “वाढ-मुक्त किंमत” मॉडेलवर चालते. मंत्र्यांनी सांगितले की 80% कमाई थेट चालकांच्या बँक खात्यात जाईल, तर 20% प्लॅटफॉर्म विस्तारासाठी राखीव ठेवली जाईल.

राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचे उद्दिष्ट:

सध्या, दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये पायलट प्रकल्प यशस्वीरित्या राबविले जात असतानाच, अमित शाह यांनी दिल्लीमध्ये घोषणा केली की, भारतटॅक्सी पुढील तीन वर्षांत “काश्मीर ते कन्याकुमारी” पर्यंत देशभरात सुरू केली जाईल.

‘भारत टॅक्सी’ म्हणजे काय?

भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी-आधारित कॅब सेवा असणार आहे. अधिकृतरित्या 5 फेब्रुवारी 2006 रोजी भारत टॅक्सी सुरू करण्यात आली. अमूल, इफको, नाफेड आणि कृभको यासह देशातील आठ आघाडीच्या सहकारी संस्थांनी संयुक्तपणे तिचा प्रचार केला. तिचे ध्येय जनतेला परवडणाऱ्या आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा देणे आणि कॅब चालकांना खाजगी कंपन्यांपासून शोषणमुक्त वातावरण प्रदान करणे आहे.

विमा आणि सुरक्षा:

भारत टॅक्सीमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक सारथीला 5 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा आणि 5 लाख रुपयांचा कुटुंब आरोग्य विमा दिला जाणार आहे.

“सारथी दीदी” उपक्रम:

महिला सक्षमीकरण आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे यावेळी ठरवण्यात आले. “सारथी दीदी” उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत, महिला दुचाकी चालक केवळ महिला प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवतील.

काम करण्याचे स्वातंत्र्य:

ड्रायव्हर्सना कोणत्याही विशेष कलमांचे बंधन नसणार आहे. ते या अ‍ॅपवर तसेच इतर प्लॅटफॉर्मवर मुक्तपणे काम करू शकणार आहेत.

“आता तुम्ही फक्त ड्रायव्हर नाही तर मालक आहात”

शहा म्हणाले की खाजगी कॅब कंपन्या फक्त त्यांच्या मालकांचा खिसा भरतात. त्या, तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशांपैकी 30% पैसे घेतात आणि कमाईची कोणतीही हमी नाही. पुढे ते म्हणाले, “आमची विचारसरणी सोपी आहे: जो कठोर परिश्रम करतो त्यालाच खरा नफा मिळतो, कोणत्याही मोठ्या बॉसला नाही. भारत टॅक्सी देखील त्यांच्या मालकांना श्रीमंत बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते, परंतु फरक एवढाच आहे की येथे तुम्हीच खरे मालक आहात.”

Comments are closed.