पुन्हा शिक्षणसंस्थेला गालबोट! गलगोटिया विद्यापीठाला चीननेही सुनावले खडेबोल
भारत प्रगती पथाच्या दिशेनी पाऊल टाकत असताना संपूर्ण जग भारताकडे डोळे लावून आहे. डिजिटल युगात भारत विस्मयकारक बदल करत असताना एआय समिट मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॅान यांनी भारताचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी त्यांनी भारताला ‘एआय इंजिनिअर्सचे केंद्र’ देखील संबोधले. भारताचे पाहूने भारत देशाला सुजलाम सुफलाम आणि विकसीत देश समजतात मात्र, भारतवासांनी आपली किंमत कमी करून घेण्याच काम या एआय समिटमध्ये केलं. उत्तर प्रदेश मधील गलगोटिया विद्यापीठाने दिल्लीमधील एआय समिट मध्ये भाग घेतला होता. मात्र, विद्यापीठाच्या घृणास्पद कृत्यामुळे भारताला जागतिक स्तरावरती मान खाली घालावी लागली.
नेमकं झालं तरी काय ?
एआय समिट दरम्यान गलगोटिया विद्यापीठाने चिनी कंपनीने बनविलेला रोबोट डॉग आपला स्व:त विकसीत केला असल्याचे सांगत तो प्रदर्शनात मांडला. दरम्यान, निर्माण झालेल्या वादामुळे गलगोटिया विद्यापीठाला AI परिषदेतून (AI Summit) बाहेर काढण्यात आले. दिल्लीमध्ये एआय समिट सुरू असून यामध्ये जगभरातील AI तज्ज्ञ, तसेच एआय क्षेत्राबद्दल उत्सुकता असलेल्या व्यक्ती दिल्लीमध्ये एकवटल्या आहेत. यावेळी, AI च्या भव्य प्रदर्शतान गलगोटिया विद्यापीठाने हे चिनी रोबोट डॉग्स स्वतःचे असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणावर मोठा वाद निर्माण झाला आणि या वादामुळे गलगोटिया विद्यापीठाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. चिनी कंपनीनेही गलगोटिया विद्यापीठाची जाहीरपणे लाज काढली. यामुळे विद्यापीठाला या समिटमधून जाण्यास सांगितले. यावादासंदर्भात बोलताना विद्यापीठातील प्राध्यापिका नेहा यांनी दावा केला की, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, गलगोटिया विद्यापीठाला एआय एक्सपोमधून काढलेलं नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला.
संशयाचा केंद्र बिंदू!
मंगळवारी, एआय समिटमध्ये विद्यापीठाच्या स्टॉलवरील प्रतिनिधींनी ओरियन नावाच्या रोबोटिक कुत्र्याची ओळख करून दिली आणि सांगितले की ते संस्थेच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केले आहे. दरम्यान, एआय प्रेमी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लगेचच निदर्शनास आणून दिले की हा रोबोट युनिट्री गो२ असल्याचे आढळून आले, जो चीनमधील युनिट्री रोबोटिक्सने तयार केलेला चतुष्पाद रोबोट आहे आणि जगभरात शैक्षणिक संशोधन आणि रोबोटिक्स प्रशिक्षणात मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे.
वादाला सारवासारव करण्याचा प्रयत्न!
या वादानंतर, विद्यापीठाने सुरुवातीला आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर, शिखर परिषदेच्या आयोजकांनी स्टॉलवरील वीज कापून विद्यापीठाला स्टॉल रिकामा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संस्थेने औपचारिक माफी मागितली.
केंद्राचा प्रदर्शकांना इशारा
दरम्यान, घडलेल्या प्रकरणामुळे केंद्राने बुधवारी एक इशाराही जारी केला, ज्यामध्ये असे म्हटले की, प्रदर्शकांनी त्यांच्या मालकीच्या नसलेल्या वस्तू एआय समिटमध्ये प्रदर्शित करू नयेत. विद्यापीठाच्या प्रतिनिधीने चिनी रोबोडॉग आणि ड्रोन सॉकर अखाडा संस्थेची उत्पादने एआय समिटमध्ये असल्याचा दावा केला. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed.