उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) सिंगापूरच्या दौऱ्यावरती आहेत. सोमवारी, त्यांच्या भेटीपूर्वी, युनिव्हर्सल सक्सेस ग्रुपने (Universal Success Group) राज्यात एकूण ₹6,650 कोटींच्या गुंतवणुकीसाठी तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. ही गुंतवणूक ग्रुप हाऊसिंग, लॉजिस्टिक्स आणि हायपरस्केल डेटा सेंटर्ससारख्या धोरणात्मक क्षेत्रांबाबत असेल. या तीन प्रकल्पांमुळे 20,000 हून अधिक रोजगार निर्माण होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी, मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना राज्यातील धोरणात्मक स्थिरता, तसेच उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली. पुढे त्यांनी डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी लखनौला येण्याचे आमंत्रण देखील दिले. योगी म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक स्तरावर गुंतवणूकदारांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.
या क्षेत्रांमध्ये स्वाक्षऱ्या झालेले सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय थीम-आधारित गट गृहनिर्माण प्रकल्प:
यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA) क्षेत्रातील जेवर विमानतळाजवळ 100 एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय थीम-आधारित टाउनशिप विकसित केली जाणार आहे. तसेच, यासाठी ₹3,500 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित केली जाणार आहे. यामुळे अंदाजे 12,000 लोकांना रोजगार मिळेल. हा प्रकल्प 2027 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
कानपूर-लखनऊ महामार्गावर होणार लॉजिस्टिक्स पार्क
कानपूर-लखनऊ महामार्गावर 50 एकर जमिनीवर लॉजिस्टिक्स पार्क उभारला जाईल असं ही ते यावेळी म्हणाले. त्यासाठी 650 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित केली जाईल. यामुळे अंदाजे 7,500 नोकऱ्या निर्माण होतील. तसेच, ते 2027 मध्ये ते कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
नोएडा/ग्रेटर नोएडा येथे हायपरस्केल डेटा सेंटर पार्क
नोएडा/ग्रेटर नोएडा परिसरात 10 एकर जमिनीवर 40 मेगावॅट आयटी पॉवर क्षमतेचा हायपरस्केल डेटा सेंटर पार्क उभारण्यात येईल. यासाठी 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. तर, यामुळे अंदाजे 1,500 लोकांना रोजगार मिळेल. हा प्रकल्प 2028 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed.