ए़़डलवाईज अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडतर्फे ‘एडलवाईज निफ्टी 500 मल्टीकॅप मोमेंटम क्वॉलिटी 50 इडेंक्स फंड आणि एडलवाईज निफ्टी 500 मल्टीकॅप मोमेंटम क्वॉलिटी 50 इटीएफ (इटीएफ)’ योजनांचा शुभारंभ

भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या एएमसीपैकी एक असलेल्या ए़़डलवाईज अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने (इएएमसी/इएमएफ) एडलवाईज निफ्टी 500 मल्टीकॅप मोमेंटम क्वॉलिटी 50 इडेंक्स फंड (इंडेक्स फंड) आणि एडलवाईज निफ्टी 500 मल्टीकॅप मोमेंटम क्वॉलिटी 50 इटीएफ (इटीएफ) हे दोन नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी आणले आहेत. नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) गुंतवणूकीसाठी 11 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान खुली राहणार आहे. हा मल्टी फॅक्टर अर्थात बहुआयामी इंडेक्स फंड- गती (मोमेंटम) आणि गुणवत्ता (क्वॉलिटी) या दोन घटकांवर आधारलेला आहे. निफ्टी 500 समभागांतून निवडलेल्या 50 समभागांच्या कामगिरीनुरूप हे फंड वाटचाल करत जाणार आहे. अतिशय सक्षम असलेले त्याचबरोबर किंमतीत गती असलेल्या समभागांत गुंतवणूकीची संधी हे फंड प्रदान करत आहेत.

निफ्टी 500 मल्टीकॅप मोमेंटम क्वॉलिटी 50 निर्देशांकाच्या कामगिरीचे तंतोतंत प्रतिबिंब आपल्या कामगिरीत उमटविण्याचे उद्दीष्ट या फंडानी आखलेले आहे. अर्थात कामगिरीतील त्रुटींच्या विहीन ही कामगिरी राहणार आहे. संबंधित निर्देशांक निफ्टी 500 समभागांच्या गटातून निवडलेल्या 50 समभागांच्या कामगिरीचे सातत्याने अनुकरण करत जाणार आहे.

नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एडलवाईज म्युच्यूअल फंडाच्या एमडी आणि सीईओ श्रीमती राधिका गुप्ता म्हणाल्या, “हा इंडेक्स फंड आणि इटीएफ योजनेचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गुणवत्तारुपी घटक सध्या चमकदार कामगिरी बजावत असून त्याचा लाभ हे फंड घेणार आहेत. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप श्रेणीत बाजारातील प्रवाहांना हेरताना त्याचबरोबर जोखीम अल्प ठेवत गती आणि गुणवत्ता यांचा मिलाफ घडवत हे फंड बळकट वित्तीय कामगिरी, कमाईत स्थिरता आणि सातत्तपुर्ण मूलभूत घटकांचे पाठबळ असलेल्या समभागांची निवड करणार आहेत.”

निफ्टी 500 मल्टीकॅप मोमेंटम क्वॉलिटी 50 इंडेक्समधील सर्व समभागांत हा फंड निर्देशांकात असलेल्या त्यांच्या अधिभारानुसारच गुंतवणूक करणार आहे. ही योजना दोन पुरक घटकांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते घटक म्हणजे-गती आणि गुणवत्ता. त्याआधारे बाजार प्रवाहानुरूप जोखीम आधारित परतावा प्रदान करणार आहेत. इंडेक्स फंडामध्ये प्रारंभिक गुंतवणूक एकरकमी स्वरुपात करता येईल. तसेच प्रतिअर्ज 100 रुपयांची एसआयपी आणि त्यांनतर एक रुपयांच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येणार आहे. तर इटीएफ फंडात सुरुवातीला किमान पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. इंडेक्स फंडाचे व्यवस्थापन श्री. भावेश जैन, को-हेड, फॅक्टर इन्हेस्टींग आणि श्री. भारत लाहोटी, को-हेड, फॅक्टर इन्हेस्टींग, एडलवाईज म्युच्यूअल फंड हे सांभाळणार आहेत, तर इटीएफ फंडाचे व्यवस्थापन श्री. भावेश जैन, को-हेड, फॅक्टर इन्हेस्टींग, एडलवाईज म्युच्यूअल फंड यांच्याकडे राहणार आहे.

Comments are closed.