हिरो करतेय EV साठी तयारी, तब्बल 420 कोटींची होणार गुंतवणूक
मोटारसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या Hero Motocorp ने शुक्रवारी Ather Energy मध्ये 420 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली .
मोटारसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या Hero Motocorp ने शुक्रवारी Ather Energy मध्ये 420 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली .
याआधी एथर एनर्जीमध्ये हिरोची हिस्सेदारी 34.8 टक्के होती. शेअरहोल्डिंगमध्ये नेमकी किती वाढ होईल हे फंड उभारणी फेरी पूर्ण झाल्यावर निश्चित केले जाईल.
स्वदेश श्रीवास्तव,(प्रमुख – Hero येथे इमर्जिंग मोबिलिटी बिझनेस युनिट म्हणाले,“अलिकडच्या वर्षांत एथर एनर्जीची वाढ पाहून आम्ही उत्साहित आहोत . Hero Motocorp ब्रँडचा विस्तार करणे आणि जगभरातील ग्राहकांसाठी EV (इलेक्ट्रिक वाहन) मालकी सोयीस्कर, त्रासमुक्त आणि फायद्याचा अनुभव बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे”.
फर्मने सांगितले की ते इनोर्गानिक उपक्रमांद्वारे अनेक संधीकडे लक्ष देत आहे.
हिरो या वर्षी मार्चमध्ये त्याच्या पहिल्या ईव्हीचे अनावरण करण्याच्या तयारीत आहे. “एथर एनर्जी आणि गोगोरो इंक सारख्या भागीदारांसोबत केलेल्या गुंतवणुकीद्वारे आणि भागीदारीद्वारे, Hero Motocorp देखील संपूर्ण EV इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. उत्पादनांपासून ते तंत्रज्ञान, विक्री, सेवा, ग्राहक सेवा, ऑपरेशन्स आणि इनोव्हेशनपर्यंत कंपनी काम करण्याच्या तयारीत आहे.
Comments are closed.