हिरो मोटर्सने 900 कोटी रुपयांचा आयपीओ डीआरएचपी प्रस्ताव दाखल

हिरो मोटर्स कंपनी समूहातील वाहनांसाठीच्या सुट्या भागांची उत्पादन करणारी प्रमुख कंपनी असलेली तसेच भारतात वाहन तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या त्याचबरोबर दक्षिण आशियात विस्तारासाठी गुंतवणूकीचे पाठबळ लाभलेल्या हीरो मोटर्सने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) द्वारे 900 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीने या भांडवल उभारण्यासाठी शेअरबाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला रेड हेरिंग प्रस्तावाचा मसुदा (DRHP) दाखल केला आहे.

कंपनीच्या या आयपीओत 500 कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि प्रवर्तकांकडून 400 कोटी रुपयांपर्यंतच्या हिस्सा विक्रीचा पर्याय असे मिश्रण आहे. ओएफएसमध्ये ओपी मुंजाल होल्डिंग्सचे 250 कोटी रुपये आणि भाग्योदय इन्व्हेस्टमेंट्स आणि हिरो सायकल्सचे प्रत्येकी 75 कोटी रुपयांचे शेअर्स समाविष्ट आहेत.

कंपनी आपल्या बुक-रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी 100 कोटी रुपयांच्या आयपीओपूर्व प्लेसमेंट निधीचा विचार करू शकते. जर असा निधी पूर्ण झाले तर नवीन इश्यूमधून रक्कम कमी केली जाईल.

शेअर्सच्या ताज्या इश्यूमधून मिळालेल्या रकमेपैकी कंपनी 202 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम काही थकीत कर्जाच्या संपूर्ण किंवा काही प्रमाणात, परतफेड किंवा मुदतपूर्व-परतफेडीसाठी केला जाईल. तसेच आमच्या गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश या प्रकल्पाच्या क्षमता विस्तारासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी भांडवली खर्चासाठी 124 कोटी रु तसेच सर्वसाधारण कंपनी कामकाजासाठी काही रक्कम वापरली जाणार आहे.

हिरो मोटर्स ही अमेरिका,युरोप, भारत आणि आसियान विभागातील ऑटोमोटिव्ह ओइएमसाठी उच्च अभियांत्रिकी पॉवरट्रेन पर्यायाचा आराखडा बनविणे, विकसित करणे, उत्पादन करणे आणि याचा पुरवठा करण्यात गुंतलेली भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. (स्त्रोत- क्रिसील अहवाल) , कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये दुचाकी, ई-बाईक, ऑफ-रोड वाहने, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार, हेवी-ड्युटी वाहने आणि eVTOL यासह विविध वाहन श्रेणींसाठी इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्सचा समावेश आहे.

हीरो मोटर्स दोन विभागांमध्ये कार्य करते – पॉवरट्रेन सोल्यूशन्स आणि मिश्र धातु आणि धातू. कंपनीचे भारत, ब्रिटन आणि थायलंडमध्ये सहा उत्पादन प्रकल्प आहेत.

बीएमडब्लू एजी, ड्युकाटी मोटर होल्डींग एसपीए, एननव्हीओलो इंटरनॅशनल, फॉर्म्युला मोटरस्पोटर्स, हमिंगबर्डेव, एचडब्लू एजी आणि आघाडीच्या जागतिक ई-बाईक उत्पादकांसारख्या जागतिक ब्रँड्ससह कंपनीकडे वैविध्यपूर्ण ग्राहक आधार आहे.

हीरो मोटर्स ही भारतातील जागतिक ई-बाईक ओईएममध्ये सीव्हीटी हबची निर्मिती आणि निर्यात करणारी एकमेव कंपनी आहे.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये हिरो मोटर्सचे कामकाजी उत्पन्न ₹1,064.4 कोटी होते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, डॅम कॅपिटल ॲडव्हायझर्स आणि जेएम फायनान्शियल या इश्यूसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

DRHP Link: https://www.bseindia.com/corporates/download/355016/1.%20DRHP%20Hero%20Motors%20Limited_23082024_20240823221948.pdf

Comments are closed.