श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर गुरुवार 5 सप्टेंबर 2024 पासून प्रांरभ, प्रति इक्विटी समभागासाठी प्राईस बँड 78 ते 83 रुपये
मोठ्या आकाराच्या लवचिक साठवणूक बॅग्जसारख्या इंटरमीडिएट बल्क कंटेनर्सची (एफआयबीसी) निर्मिती आणि विक्री करणाऱ्या त्याचबरोबर भारतीय बाजारपेठ आणि परदेशातील ग्राहकांसाठी विणलेली खास पोती आणि कापड, पातळ फॅब्रिक, टेप्स यासारख्या औद्योगिक पॅकेजिंग उत्पादनात कार्यरत असलेल्या श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंग कंपनी लिमिटेडने आपल्या पहिल्या प्रारंभिक सार्वजनिक समभागविक्री ऑफरसाठी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी समभागांसाठी 78/- ते 83/- रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
कंपनीची प्राथमिक सार्वजनिक ऑफर (“आयपीओ” किंवा “ऑफर”) गुरुवारी 05 सप्टेंबर 2024 रोजी गुंतवणूकीसाठी खुली होत आहे आणि सोमवार, 09 सप्टेंबर 2024 रोजी बंद होत आहे. गुंतवणूकदार किमान 180 इक्विटी समभागांसाठी आपली बोली लावू शकतात आणि त्यानंतर 180 इक्विटी समभागांच्या पटीत अतिरिक्त बोली सादर करु शकतील.
आयपीओमध्ये 1,47,50,000 इक्विटी समभागांच्या नवीन इश्यू आणि बिनोद कुमार अग्रवाल यांच्या 56,90,000 इक्विटी समभागांच्या ऑफर फॉर सेल (“ओएफएस”) यांचा समावेश आहे.
नवीन समभागविक्रीतील 31.45 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीने घेतलेल्या काही थकीत कर्जाची अंशत: किंवा पूर्ण परतफेड आणि/किंवा मुदतपूर्व परतफेडीसाठी वापरली जाणार आहे. तसेच एचपीपीएल, एसटीबीएफएल आणि जेपीपीएल या उपकंपन्यातील काही थकीत कर्जाची अंशत: परतफेड आणि/किंवा मुदतपूर्व परतफेडीसाठी २०.८२ कोटी रुपये वापरले जाणार आहे. तर कंपनीच्या वाढीव खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी 13.50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून एचपीपीएल, एसटीबीएफएल आणि जेपीपीएल या उपकंपन्यांमधील कार्यरत भांडवलाची गरज पूण करण्यासाठी त्याचबरोबक सामान्य कॉर्पोरेट उद्देशासाठी गुंतवणूकीसाठी 10.74 कोटी रुपयांचा निधी गुंतविला जाणार आहे.
श्री बिनोद कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली श्री तिरुपती बालाजी ॲग्रो कंपनी ग्राहककेंद्रीत उत्पादने सादर करते. रसायने, कृषी रसायने, अन्न खाणकाम, कचरा विल्हेवाट आणि व्यवस्थापन उद्योग, कृषी उद्योग, वंगण आणि खाद्यतेल यांसारख्या विविध उद्योगांमधील ग्राहकांना त्यांच्या वाहतूक उद्देशांसाठी एफआयबीसी उत्पादने पुरविते. तसेच त्यांच्या पॅकेजिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या आकारातील पॅकेजिंगसाठीचे विविध उत्पादने आणि पर्यायही पुरवते.
कंपनी थ्री-स्टार दर्जाचे निर्यातगृह असून गत 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. तसेच सध्या कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्लास्टिक उत्पादनांचा पुनर्वापर आणि पुनर्वापरातून शाश्वत पध्दतींवर कंपनीने भर दिला आहे. पाच युनिट्सव्दारे कंपनी सध्या विविध वस्तूंचे उत्पादन करते.
मुख्यतः उत्पादनांच्या देशांतर्गत विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे श्री तिरुपती बालाजी ॲग्रो ट्रेडिंगचा एकत्रित महसूल 2024 मध्ये 13.51 टक्क्यांनी वाढून 539.66 कोटी रुपयांवर झेपावला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये हा महसूल 475.43 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2024 साठी करोत्तर नफा 74.11 टक्क्यांनी वाढून 36.07 कोटी रुपयांवर गेला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 20.71 कोटी रुपयांचा करोत्तर नफा झाला होता.
पीएनबी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
सदर ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे पूर्ण केली जाणार आहे. यात पात्र संस्थात्मक खरेदीदारांना एकूण ऑफरपैकी जास्तीत जास्त ५० टक्केच हिस्सा बोलीसाठी उपलब्ध राहणार आहे, तर गैर-संस्थात्मक बोलीदारांना किमान 15 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक हिस्सा तर किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना किमान ३५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक हिस्सा उपलब्ध राहणार आहे.
Comments are closed.