Iran-Israel Conflict: भारतीय निर्यातदारांसमोर संकट, लॉजिस्टिक्स अन् विमा खर्चात मोठी वाढ!
मध्य पूर्वेतील वाढत्या जियो पॉलिटिकल तणावामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाल्याचे चित्र आहे. इस्रायलने (Israel) इराणवर (Iran) केलेल्या हल्ल्यानंतर, इराणच्या प्रत्युत्तरात्मक कृतींमुळे हा प्रदेश एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. या संपुर्ण संघर्षाचा थेट आणि खोल परिणाम भारतीय निर्यातदारांवर होत होईल, कारण त्यांना आता लॉजिस्टिक्स आणि विमा प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत.
सप्लाय चेन संकटात
यावेळी बोलताना भारतीय (India) निर्यातदारांनी सांगितले की, जर तणाव कायम असाच राहिला तर अमेरिका (America) आणि युरोपला जाणाऱ्या निर्यातींवर गंभीर परिणाम दिसून येईल. दरम्यान, कतार, कुवेत आणि युएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने प्रत्युत्तर हल्ल्या केल्यानंतर, पर्शियन आखात आणि लाल समुद्रासारखे प्रमुख व्यापारी मार्ग आता जास्त जोखीम क्षेत्र बनले आहेत.
निर्यातदारांचे म्हणणे आहे की, युद्ध झाल्यास जहाजांना लांब मार्गांनी जावे लागेल, ज्यामुळे आमचा वाहतूक खर्च वाढेल. तसेच, संघर्षग्रस्त भागातून जाणाऱ्या जहाजांसाठी युद्ध जोखीम एका रात्रीत वाढू शकतो. शिवाय, बंदरांवर आणि मार्ग बदललेल्या मार्गांवर सुरक्षा तपासणीमुळे शिपमेंटला जागेवरती पोहोचण्यासाठी आठवड्याचा कालावधी जास्त लागू शकतो.
कच्च्या तेलाचे गणित
तज्ज्ञांच्या मते, मध्य पूर्व हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून जगासाठी एक पॉवरहाऊस आहे. त्याच्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती देखील वाढतील हे निश्चितच आहे. याचा परिणाम केवळ भारताच्या आयात बिलावरच नाही तर स्थानिक गोष्टींच्या खर्चातही वाढेल, ज्यामुळे उत्पादन अधिक महाग होईल.
निर्यातदारांकडून मागणी
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) च्या सदस्यांचे म्हणणे आहे की, सध्या देशांनी स्थिरता राखणे हे एक मोठे आव्हान आणि गरज आहे. जर युद्ध वाढले तर लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (MSMEs) त्यांचे नफा सुरक्षित ठेवणे कठीण होईल. या कठीण काळात भारतीय व्यवसायांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने कर्ज सुविधा आणि पर्यायी व्यवसाय मार्गांवर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांनी मागणी केली आहे.
Comments are closed.