युद्धाचा बासमती व्यापारावर फटका; हरियाणवी निर्यातदार चिंतेत

अमेरिका (America) आणि इस्रायली (Israel) लष्करी हल्ल्यांमुळे हरियाणामधील तांदूळ निर्यातदारांना उशीरा पैसे मिळत आहेत. इराण (Iran) आणि अफगाणिस्तानला जाणाऱ्या मालाच्या वाहतुकीत युद्धामुळे व्यत्यय येण्याची भीती दर्शवली जात आहे. “व्यापारावर संघर्षाचा काहीसा परिणाम दिसून येत आहे,” असे तांदूळ निर्यातदार संघटनेचे राज्य युनिट अध्यक्ष सुशील कुमार जैन यांनी रविवारी सांगितले.

दरम्यान, इराणच्या सर्वात मोठ्या बंदर, बंदर अब्बास मार्गे इराण किंवा अफगाणिस्तानला जाणारी शिपमेंट थांबविण्यात आली. “परिस्थिती सुधारेपर्यंत ही शिपमेंट अडकून राहतील आणि त्याचा बाजारावर परिणाम होईल असेही यावेळी सांगण्यात आले. पेमेंटमध्येही विलंब होऊ शकतो,” असेही जैन यांनी माध्यमांना सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, परिणामांचे मूल्यांकन करणे खूप घाई ठरू शकते, कारण ते युद्ध किती काळ टिकते यावर अवलंबून आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर मोठा हल्ला केला, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणी जनतेला स्वत:च्या नशिबाचा ताबा स्वत: हातात घेण्याचे सांगितले. 1979 पासून इराणी देशावर राज्य करणाऱ्या इस्लामिक नेतृत्वाविरुद्ध उठण्याचे आवाहन केले.

भारताची बासमती – तांदूळ निर्यात

बासमती – तांदूळ निर्यातीबद्दल जैन म्हणाले की, भारताची एकूण वार्षिक निर्यात 35 टक्के आहे जी एकट्या हरियाणामधून होतो.
करनाल येथील तांदूळ गिरणी कामगार नीरज कुमार म्हणाले, “कालपासून, संघर्ष सुरू झाल्यानंतर अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. संघर्ष सुरू झाल्यानंतर एका दिवसातच व्यापारावर परिणाम दिसून येत आहेत, ज्यामुळे बासमतीच्या दरात प्रति किलो सुमारे 4-5 रुपयांची घसरण झाली, जे प्रति क्विंटल 400-500 रुपये एवढी आहे.”

“गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या इराण-इस्रायल संघर्षाचा संदर्भ देत कुमार म्हणाले की, “गेल्या वेळी जूनमध्ये असाच परिणाम झाला होता. भारताच्या बासमती निर्यातीत हरियाणाचा सर्वाधिक वाटा आहे. असे ते म्हणाले.

इराण हा बासमतीचा आमचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.

“इराण आमच्याकडून सर्वांत जास्त बासमती खरेदी करते. तसेच, बासमती युएई, ओमान, येमेन आणि इराकसह इतर देशांमध्ये देखील निर्यात केला जातो. मार्च महिन्यातील निर्यातीवर परिणाम होउ शकतो असंही ते यावेळी म्हणाले. कर्नाल हे बासमती निर्यातीचे मुख्य केंद्र असून, कैथल आणि सोनीपत हे देखील परदेशी निर्यातीत योगदान देत असतात.

युद्धादरम्यान जहाजांसाठी विमा संरक्षण नसल्याबद्दल निर्यातदारांनी चिंता व्यक्त केली. सौदी अरेबियानंतर इराण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा व्यापारी आहे. 2024-25 आर्थिक वर्षात भारताने इराणला सुमारे 10 लाख टन सुगंधी धान्य निर्यात केले आहे.

2024-25 दरम्यान भारताने अंदाजे 6 दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात केली आहे. ज्याची मागणी प्रामुख्याने मध्य पूर्व आणि पश्चिम आशियाई बाजारपेठेमुळे झाली आहे. इतर प्रमुख खरेदीदारांमध्ये इराक, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका यांचा देखील समावेश आहे.

Comments are closed.