जॅकसन इंजिनिअर्स 2,000 कोटी रुपये सौर उत्पादनात गुंतवणार
जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेड (JEL), जो की ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील जॅकसन ग्रुपचा एक भाग आहे, त्याच्या सौर उत्पादन व्यवसायाचा मोठा विस्तार करणार आहे. कंपनी सुमारे 2,000 कोटी रुपये गुंतवून 2,500 मेगावॅट क्षमतेच्या सौर सेल उत्पादन सुविधा उभारणार आहे, जी दोन टप्प्यांमध्ये विकसित केली जाईल. त्याचबरोबर कंपनी सध्या अस्तित्वात असलेल्या सौर मॉड्यूल उत्पादन क्षमतेला 2,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार आहे. हा विस्तार जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडसाठी एक महत्वाचा टप्पा आहे, जो सौर ऊर्जा उपायांसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. उत्पादन क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करून, जॅकसन आपल्या ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे आणि जागतिक पातळीवर नवीकरणीय ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या बदलाला मोठे योगदान देणार आहे.
या ऐतिहासिक घडामोडीबद्दल बोलताना, जॅकसन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील गुप्ता म्हणाले, “आम्ही आमच्या उत्पादन क्षमतेतील या मोठ्या वाढीची घोषणा करताना अत्यंत आनंदित आहोत. हा विस्तार बाजारात आमची स्थिती मजबूत करतो आणि जॅकसनच्या सौर उत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीला अधोरेखित करतो. आमची कंपनी सातत्याने नवीन उंची गाठत आहे. ही वाटचाल भविष्यातही आम्हाला पूर्णपणे एकत्रित सौर उपाय प्रदाता बनण्याचा आमचा मनास मजबूत करते.”
जॅकसनची दर्जेदार उत्पादने आणि सेवांबाबतची वचनबद्धता कायम राहिली आहे. नवीन अत्याधुनिक TOPCON तंत्रज्ञानासह हा विस्तार कंपनीच्या शाश्वततेला आणि नावीन्यतेला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांचा कार्यक्षमतेमध्ये आणि विश्वासार्हतेमध्ये उच्च दर्जा सुनिश्चित केला जातो. सौर सेल उत्पादन सुविधा पहिला टप्पा पुढील 15 महिन्यांत सुरू होणार आहे, तर मॉड्यूल प्लांटचा विस्तार सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या विस्तार योजनेमुळे या भागात 1,200 नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
हा मोठा गुंतवणूक निर्णय भारतातील शाश्वत ऊर्जा विकासासाठी जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. भारताची सध्याची सौर सेल उत्पादन क्षमता फक्त 7 GW आहे, अशा परिस्थितीत जॅकसनचा हा विस्तार देशात होणाऱ्या आयाती वर अवलंबून न राहत देशांतर्गत उत्पादनात वाढ करेल. “आत्मनिर्भर भारत” साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
गुप्ता पुढे म्हणाले, “जॅकसन ग्रुप सतत प्रगती करत आहे, आणि हा विस्तार आमच्या दृष्टिकोनाचा आणि आमच्या उच्च गुणवत्तेच्या सौर उत्पादनांसाठी वाढत्या मागणीचा पुरावा आहे. आम्ही आमची मागणीची पूर्तता करण्याच्या क्षमतेला अधिक मजबूत करत आहोत आणि ग्राहकांना उत्तम मूल्य देण्यासाठी सज्ज आहोत.”
आगामी काळात, जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेड 5,000 मेगावॅट क्षमतेचा एकत्रित सौर वेफर, सेल आणि मॉड्यूल निर्माता बनण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, जे भारताच्या नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहे. शाश्वत ऊर्जेसाठी बांधिलकी असलेल्या जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडने शाश्वत ऊर्जेच्या दिशेने देशाच्या प्रवासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जॅकसन ग्रुपबद्दल: 1947 मध्ये स्थापन झालेली जॅकसन ग्रुप ही डिझेल जनरेटर उत्पादनात विशेष कौशल्य असणारी कंपनी असून आता ती एक बहुआयामी ऊर्जा उपाय प्रदाता झाली आहे. कंपनीच्या कार्यक्षेत्रात विखुरलेली ऊर्जा, सौर ऊर्जा, पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत, पर्यायी इंधन, उच्च-तंत्रज्ञान ऊर्जा साठवण प्रणाली आणि नागरी व पायाभूत सुविधा EPC सेवा यांचा समावेश आहे.
Comments are closed.