तासाभरात फिनिश! MG Astor ची तुफान विक्री
The new MG Astor Savvy has been priced between ₹15.78-17.38 lakh (ex-showroom)
MG Motor Astor गुरुवारी सकाळी 11 वाजता बुकिंगच्या काही मिनिटातच पूर्णपणे विकली गेली. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, कारचे 5,000 युनिट 20 मिनिटांत बुक केले गेले.
MG मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, “ग्राहकांकडून आम्हाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आनंदी आहोत. दरम्यान सध्या सुरू असलेल्या जागतिक चिपचे संकट पाहता आम्ही फक्त मर्यादित संख्येने कार पुरवू शकतो.आम्हाला अपेक्षा आहे की पुढील वर्षी Q1 पासून पुरवठा चांगला होईल”.
MG चे Astor मॉडेल कंपनीच्या ग्लोबल प्लॅटफॉर्म ZS वर आधारित आहे जे दोन इंजिन पर्यायांसह 220 TURBO पेट्रोल इंजिनसह सिक्स स्पीड AT 140ps पॉवर वितरीत करते. 1.5 लीटर, फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिन हे VTI-tech CVT ट्रान्समिशनसाठी 110 पीएस पॉवर आणि 144 एनएम पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.
हे पाच सीटर मॉडेल स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि टॉप-ऑफ-द-लाइन ह्या चार ट्रिममध्ये येते.
Astor ची एक्स-शोरूम किंमत 9.78-16.78 लाख दरम्यान आहे. MG ने शार्प ट्रिमवर ADAS पॅकेजच्या किंमती देखील उघड केल्या आहेत, जे नवीन टॉप -स्पेक – ‘सॅव्ही’ ट्रिम तयार करतात. नवीन MG Astor Savvy ची एक्स-शोरूम किंमत 15.78-17.38 लाख दरम्यान आहे.
ADAS लेव्हल -2 एटोनोमस ड्रायव्हर असिस्टॅन्स फिचर्स उपलब्ध करते. यात अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्गेन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि लेन-कीपिंग असिस्ट यांचा समावेश होतो.
MG ने एम्बेडेड सिम आणि तंत्रज्ञानासाठी Jio सोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून कारमध्ये हाय-स्पीड इन-कार कनेक्टिव्हिटी मिळेल. जिओचे eSIM आणि IoT सोल्यूशन्स MG युजर्सना रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी, इन्फोटेनमेंट आणि टेलिमॅटिक्समध्ये प्रवेश करण्यास सक्षम करतील.
49 सेक्युरिटी फिचर्ससह आणि अत्याधुनिक रडार तसेच कॅमेरा सिस्टीमसह कार अद्ययावत आहे.
कारमध्ये ‘ डिजिटल कार की ‘ द्वारे म्युझिक आणि एसी कंट्रोलसाठी तसेच मित्र आणि कुटुंबासह लोकेशन शेअरिंग करू शकतो.
कार 3-3-3 स्टँडर्ड पॅकेजसह येते, ज्यात तीन वर्ष/अमर्यादित किलोमीटरची हमी, तीन वर्ष रोडसाईड असिस्टंट आणि तीन लेबर फ्री सेवांचा समावेश आहे.
Comments are closed.