एसबीआय बॅलन्स्ड अॅ़डव्हांटेज फंडाचे तीन वर्षे पूर्ण

ऑगस्ट 2021 मध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या आणि नवीन फंडाच्या ऑफरवेळी 14,600 कोटी रुपयांचे सर्वोच्च निधी संकलन करणाऱ्या एसबीआय बॅलन्स्ड अॅ़डव्हांटेज फंडाने तीन वर्ष पूर्ण केले आहेत. या फंड योजनेने सुरुवातीपासून ( 31 ऑगस्ट 2021) 14.11 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर या योजनेसाठी आधारभूत निर्देशांक असलेल्या ऩिफ्टी फिफ्टी हायब्रीड कॉम्पोझिट डेट 50:50 निर्देशांकाने 10.58 टक्के तर बीएसई सेन्सेक्सने 14.15 टक्के परतावा दिला आहे. ही योजना सुरू झाली तेव्हा एखाद्याने एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती, तर त्या गुंतवणूकीचे मूल्य 31 ऑगस्ट 2024 रोजी 1,48,630 रुपये असते.

समभाग आणि रोखे गुंतवणुकीच्या लवचिक संयोगातून दीर्घकालीन भांडवलवृध्दी आणि उत्पन्न प्रदान करणे, हे या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट आहे. तथापि, योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण होईलच, याची खात्री देता येत नाही.

31 ऑगस्ट 2024 पर्यंत, या योजनेने समभागांत 30.37 टक्के रक्कम तर शिल्लक रक्कम रोख्यांमध्ये गुंतवलेली आहे.

गेल्या एक वर्षांत या योजनेने चक्रवाढ पध्दतीने 24.17 टक्के परतावा दिला आहे, तर योजनेसाठीच्या पायाभूत निदेशांका (ऩिफ्टी फिफ्टी हायब्रीड कॉम्पोझिट डेट 50:50) ने 19.98 टक्के परतावा दिलेला आहे.

जर सुरुवातीपासून 10,000 रुपयांची मासिक एसआयपी या योजनेत केली गेली असती (रु. 3.60 लाखांची गुंतवणूक), तर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या गुंतवणूकीचे मूल्य 4 लाख 72 हजार 894 रुपये असते.

योजनेचा एयूएम 31 ऑगस्ट 2024 रोजी 32,440.95 कोटी रुपये असून सुमारे 5,97 लाख फोलिओ आहेत. या योजनेचे निधी व्यवस्थापक इक्विटी प्रमुख दिनेश बालचंद्रन हे समभागातील गुंतवणूकीचे व्यवस्थापन पाहत आहेत. तर स्थिर उत्पन्न विभागाचे सीआयओ राजीव राधाकृष्णन आणि मानसी सजेजा रोखे गुंतवणूकीसाठी सह-निधी व्यवस्थापक (नोव्हेंबर 2023 पासून) आहेत. याचबरोबर विदेशी गुंतवणूकीचे व्यवस्थापन प्रदीप केसवन सांभाळत आहेत.

Comments are closed.