आनंदाची बातमी! SBI ने FD वरील व्याजदरात केली वाढ

देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली.

देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली.

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी मुदत ठेवींवरील व्याजदर 5.0 टक्क्यांवरून 5.1 टक्के करण्यात आला आहे. SBI च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर 5.50 टक्क्यांवरून 5.60 टक्के करण्यात आला आहे . हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर लागू आहे. नवीन दर 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

इतर मुदतीच्या FD वरील व्याजदर अपरिवर्तित आहेत . SBI 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर सर्वाधिक 5.40 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर 6.20 टक्के व्याजदर आहे.

दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 5.10 टक्के आहे. 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.30 टक्के व्याजदर आहे.

Comments are closed.