श्रीराम फायनान्स लिमिटेडतर्फे गोल्ड लोनसाठी ‘जितक्या मुदतीसाठी कर्ज , तितक्याच दिवसांचे व्याज’ उपक्रमाचा महाराष्ट्रात शुभारंभ
श्रीराम फायनान्स लिमिटेडने आगामी सणासुदीच्या अगदी आधी ग्राहकांना सहज आणि सोयीस्करपणे निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात गोल्ड लोनसाठी ‘जितक्या मुदतीसाठी कर्ज, तितक्याच दिवसांचे व्याज’ उपक्रम सुरू केला आहे.
श्रीराम फायनान्स, या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातील शाखांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक करेल आणि त्यांचे गोल्ड लोन शाखांमध्ये रूपांतर करेल. सध्या, महाराष्ट्रातील 281 शाखांपैकी 105 शाखा गोल्ड लोन देतात. वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत, महाराष्ट्र राज्यात श्रीराम फायनान्सने एकूण ₹ 23,918.72 कोटींचे कर्ज वाटप केले आहे, ज्यातले ₹ 1,055.74 कोटी गोल्ड लोन पोर्टफोलिओचे आहे.
या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना, श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या विपणन कार्यकारी संचालक, सुश्री एलिझाबेथ वेंकटरामन म्हणाल्या, “ग्राहकांशी आमच्या संवादातून आम्हाला आढळून आले की आपल्या विविध आर्थिक गरजांसाठी नियमित रित्या आपले सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याकडे आणि कर्जाची परतफेड करून आपले सोने सोडवून घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. येत्या सणासुदीचा काळ लक्षात घेता आमचा हा उपक्रम ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.”
गोल्ड लोन साठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना ‘जितक्या मुदतीसाठी कर्ज, तितक्याच दिवसांचे व्याज’ या उपक्रमांतर्गत कर्जाच्या कालावधीसाठीच व्याज चुकते करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत, स्पर्धात्मक व्याजदरावर, किमान कालावधी किमान सात (०७) दिवसांपासून सुरु होतो आणि जास्तीतजास्त १२ महिन्यांसाठी दिला जातो.
Comments are closed.