Stardew Valley गेमने केली ₹7276.24 कोटींची कमाई! संपूर्ण वाचा…
कल्पना करा, तुम्ही तुमची थकवणारी कॉर्पोरेट नोकरी आणि फाइल्सचे ढीग कायमचे मागे टाकून, आजोबांकडून वारसा मिळालेलं छोटंसं घर, हिरवीगार जमीन, आणि मूठभर बियाणं त्यासोबत एक शांत गाव जिथे तुम्हाला कायम जाऊ वाटत. इथे तुम्ही फक्त पिकं पिकवत नाही, तर आधुनिक धावपळीत हरवलेली मनःशांती सुद्धा पुन्हा शोधत आहात. हेच आहे स्टारड्यू व्हॅलीचं जादुई जग.
दरम्यान आपण बोलत आहे एका गेम संदर्भात. तर, गेल्या 10 वर्षांत या गेमने यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. आतापर्यंत सुमारे 50 million प्रती विकल्या गेल्या असून, अंदाजे $1.2 billion (सुमारे ₹7276.24 कोटी) इतकी कमाई या गेमने केली आहे.ही कामगिरी अनेक मोठ्या फ्रँचायझींनाही मागे सारणारी आहे.
विशेष म्हणजे, हा गेम कोणत्याही मोठ्या स्टुडिओने नव्हे तर एरिक बैरोन (Eric Baron) या एकट्या डेव्हलपरने तयार केला. गेमिंग विश्वात “ConcernedApe” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅरोनने 2016 मध्ये ही गेम रिलीज केली. संगणक शास्त्राचा अभ्यास करत असताना, कोणताही व्यावसायिक अनुभव नसताना त्याने कोडिंग करायला सुरुवात केली. तसेच, कला आणि संगीत यावर एकट्याने काम केले. या गेमची पहिली आवृत्ती तयार होण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली होती. सुरुवातीला हा प्रकल्प नोकरीसाठी पोर्टफोलिओ म्हणून तयार करण्यात आला होता, पण हळूहळू त्याच प्रकल्पाने त्याला जागतिक ओळख मिळवून दिली.
हा खेळ केवळ शेती सिम्युलेटर नसून काल्पनिक Pelican Town मधील प्रत्येक पात्राची स्वतःची कहाणी आहे. तुटलेली नाती, नैराश्य आणि मद्यपान यांसारख्या मानवी आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेकांसाठी हा गेम म्हणजे डिजिटल थेरपीसारखाच आहे.
यश केवळ गेमपुरते मर्यादित राहिले नाही त्यानंतर स्टारड्यू व्हॅली (Stardew Valley) वर आधारित कुकबुक, बोर्ड गेम आणि 35 सदस्यांच्या बँडसह 2 जागतिक ऑर्केस्ट्रा टूरही आयोजित करण्यात आल्या. एकट्या व्यक्तीने तयार केलेली बौद्धिक आणि संपत्ती संपन्न कहाणी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
Comments are closed.