सेन्सेक्स-निफ्टीत तेजी, बहुतांश शेअर्समध्ये खरेदीचा जोर

काल मोठी घसरण झाल्यानंतर आज, बुधवार 25 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतल्याचे दिसते आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि आयटी शेअर्समध्ये (IT Shares) वाढलेल्या खरेदीमुळे बाजार पुन्हा मजबूत झाल्याचे दिसत आहे.

सकाळी BSE Sensex 514.55 अंकांनी (0.63%) वाढून 82,740.47 वर गेला. तसेच NIFTY 50 – 155.70 अंकांनी (0.61%) वाढून 25,580.35 वर पोहोचला. दरम्यान, काल 1,068 अंकांनी घसरलेल्या बाजाराने आज चांगले पुनरागमन केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आजच्या तेजीमध्ये आयटी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तर, NIFTY IT निर्देशांक सर्वाधिक वाढला. याशिवाय धातू, रिअल्टी, तेल-वायू, संरक्षण आणि मीडिया क्षेत्रातही खरेदी केल्याचे दिसून आले. मोठ्या कंपन्यांसोबत मध्यम आणि लहान कंपन्यांचे शेअर्सही यामुळे वाढले आहेत.

एकूणच, कालच्या घसरणीनंतर आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी दिलासादेणार ठरला आहे. आज बाजारात बहुतांश शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे आणि वातावरण देखील सकारात्मक आहे. सेन्सेक्समध्ये Tech Mahindra, HCL Technologies, Tata Consultancy Services, Tata Steel आणि Power Grid Corporation of India या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.

शिवाय, Sun Pharmaceutical Industries, Adani Ports and Special Economic Zone आणि ICICI Bank यांच्या शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली आहे. मात्र, State Bank of India, Bajaj Finance आणि Asian Paints या काही शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली आहे. एकंदरीत, घसरणाऱ्या शेअर्सपेक्षा वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त असल्यामुळे बाजाराचा कल सकारात्मक दिसत आहे.

Comments are closed.