Toll Plaza Update: १ तारखेपासून रोख व्यवहार महाग; NHAIचा नवीन नियम लागू
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, १ एप्रिलपासून देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या राष्ट्रीय महामार्ग शुल्क प्लाझावर रोख रक्कम भरणे बंद करण्याची योजना आखली आहे. १ एप्रिलनंतर लोकांना टोल शुल्क केवळ FASTag आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारख्या डिजिटल पद्धतींद्वारे करावे लागणार आहे. NHAI ने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले की, प्रत्येक ठिकाणी डिजिटल टोलिंग इकोसिस्टम विकसित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक टोल संकलनात प्रगती बळकट होईल.
फास्टॅग पेमेंटची ९८ टक्क्यांहून अधिक व्याप्ती
गेल्या काही वर्षांत, FASTag चा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त वापर झाला आहे, ज्यामुळे देशातील टोल वसूल करण्याच्या पद्धतींमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आले आहे. टोल व्यवहार सुलभ पद्धतीने होण्यासाठी वाहनांना जोडलेल्या RFID-सक्षम FASTags द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे कट होतात, ज्यामुळे टोल प्लाझावर वाहने सतत आणि संपर्करहित व्यवहार करतात. याव्यतिरिक्त, लवकर आणि विना अडथळा डिजिटल पेमेंट पर्याय प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर UPI पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
फास्टॅग म्हणजे काय?
सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, FASTag ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर आधारित एक यंत्रणा आहे जी टोल पेमेंट करण्यासाठी वापरली जाते. FASTag द्वारे, लोक त्यांची वाहने चालू असताना टोल प्लाझावर आपोआप पेमेंट करू शकतात जेणेकरून वाहतूक सुविधा सोपी होईल. वापरकर्त्यांना त्यांच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर FASTag (RFID टॅग) लावावा लागतो. तर, टोल प्लाझावरील कॅमेरा टॅग शोधतो आणि FASTag शी जोडलेल्या खात्यातून थेट टोल कापला जातो. दरम्यान, देशभरातील ७५० हून अधिक टोल प्लाझावर FASTag कार्यरत आहेत.
फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी दुप्पट टोल, तर UPI पेमेंटसाठी आकारणार जास्त शुल्क
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार, वैध आणि कार्यक्षम FASTag शिवाय प्लाझामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखीने पैसे भरल्यास वापरकर्त्याला शुल्काच्या दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. UPI द्वारे पैसे भरण्याऱ्या वापरकर्त्यांना शुल्काच्या १.२५ पट शुल्क आकारली जाईल. रोख पेमेंटमुळे गर्दी वाढते, गर्दीमुळे जास्त वेळ लागतो आणि व्यवहारांशी संबंधित वाद होतात. पूर्णपणे डिजिटल पेमेंटकडे वळल्याने देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरील १,१५० हून अधिक फी आकारणाऱ्या प्लाझावर ऑपरेशनल कार्यक्षमता मजबूत होईल, तसेच वाहतूक व्यवस्थापन सुधारेल आणि वेळ कमी लागेल अशी अपेक्षा आहे.
Comments are closed.