सणासुदीनंतर ट्रकभाडी स्थिरावली: श्रीराम मोबिलीटी बुलेटीन

सणासुदीच्या कालावधीत वाढलेल्या पातळीवर राहिल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ट्रक भांडी कमी होऊन स्थिरावली आहेत. फ्लीट युटिलायझेशनच्या चक्रीय स्वभावामुळे, सामान्यत:, उत्सवपूर्व हंगामात उत्पादकांच्या मालाच्या हालचालींमुळे ट्रक भांड्यांमध्ये वाढ होते. सणासुदीनंतर ही वाढ कमी होत जाते आणि नेहमीच्या पातळीवर येते. मुंबई-कोलकत्ता-मुंबई या मार्गावर ट्रकभाडे दरात २.१ टक्के घट झाली आहे. बंगळूर-मुंबई-बंगळूर या मार्गावर ट्रकभाडे दरात १.६ टक्के घट तर दिल्ली-बंगळूर-दिल्ली या मार्गावर गत महिन्याच्या तुलनेत १.४ टक्के घट झाली आहे. इतर प्रमुख मार्गांवरील ट्क भांड्यांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत.

ट्रक भाडी कमी होत असता, सणासुदीच्या काळात वाहन विक्रीला चालना मिळाली आणि मागील महिन्यांमध्ये उच्च इन्व्हेंटरी पातळी असूनही, ऑक्टोबर 2024 मध्ये वाहन विक्रीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात मासिक आधारावर नवीन प्रवासी वाहने आणि दूचाकी वाहनांच्या विक्रीत अनुक्रमे ७६% आणि ७२% वाढ झाली आहे, तर वार्षिक पातळीवर अनुक्रमे २४% आणि ३७% टक्के वाढ झाली आहे. दूचाकी आणि प्रवासी इव्ही वाहनांच्या विक्रीत मागील महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे २४% आणि २८% वाढ दिसून आली आहे.

वाय. एस. चक्रवर्ती, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम फायनान्स म्हणाले, “सणासुदीसाठी उत्पादकांकडून आकर्षक सवलत आणि लक्षवेधी योजना यासारख्या सहाय्यकारी घटकांमुळे ऑक्टोबर महिन्यात विशेषतः दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीला चालना मिळालेली आहे. परंतु याच महिन्यात ट्रकभाडे दरात आणि वाहन ताफ्यांच्या वापरात किंचित घट झाली असून दिवाळीसारख्या मोठ्या सणानंतर ही बाब प्रकर्षाने दिसून येते. परंतु देशाच्या बहुतांश भागात विवाह पर्वाला प्रारंभ होत असल्याने आगामी काळासाठी सकारात्मक धारणा कायम असून त्यामुळे वाहनांच्या विक्रीला आणखी बळकटी मिळण्याची आशा आहे.”

देशात मान्सून हंगाम संपल्याने पायाभूत सुविधांच्या विकासाच्या प्रकल्पांना वेग आला आहे आणि नवीन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, ज्यामुळे अर्थ मूव्हिंग इक्विपमेंटच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्यानुसार ७५% वाढ दिसून अली आणि व्यावसायिक बांधकाम उपकरण वाहनांच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्यानुसार ४४% वाढ दिसून अली.
ग्रामीण बाजारपेठेची सकारात्मक धारणा आणि या धारणेला यंदाचा उत्तम मॉन्सून व दमदार खरीप पीक उत्पादन असे दुहेरी पाठबळ लाभल्याने व्यावसायिक ट्रॅक्टरच्या विक्रीत दमदार कामगिरी दिसून आलेली आहे. या ट्रॅक्टरच्या विक्रीत मासिक ३९% तर कृषी ट्रॅक्टरच्या विक्रीत मासिक ६७% वाढ झाली आहे.

अन्य वाहनांच्या विक्रीत विशेषतः कार्टसह इ-रिक्षा, मालवाहतूक गाड्या, तीनचाकी मालवाहतूक गाड्या आदींच्या विक्रीत उत्साहवर्धक वाढ झाली आहे.

सणासुदीचा हंगाम, सुट्टीचा प्रवास यामुळे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही वाहनांचा वापर वाढतो, तसेच माल-सामानाची वाहतूक देखील नियमितपणे चालू राहते. या वाढीमुळे FASTag द्वारे टोल वसुलीत महिना-दर-महिना ८.३% वाढ झाली, तसेच डिझेल इंधन विक्री २०% वाढली आणि पेट्रोल विक्री ८% वाढली.

Comments are closed.