नविन घर घ्यायचय? तर होमलोनमध्ये ‘ही’ बँक देतेय भारी सूट

Bank of Baroda has cut its home loan rates from 6.75 percent to 6.50 percent to gain from the festive season

बँक ऑफ बडोदा ने 7 ऑक्टोबर रोजी आपल्या होमलोन दरात 25 बेसिस पॉइंट (बीपीएस) कमी करून 6.50 टक्के करण्याची घोषणा केली.

सणासुदीच्या काळात ग्राहकांना घर खरेदी करणे अधिक सोईस्कर करण्यासाठी सुधारित दर ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहतील असे बँकेने म्हटले आहे.

नवीन दर हे फ्रेश लोन, लोन ट्रान्स्फरसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध होतील असे बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बँकेने होम लोन वरील नुकत्याच जाहीर केलेल्या शून्य प्रोसेस शुल्काची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.

एच.टी. सोलंकी, (जीएम बँक ऑफ बडोदा) म्हणाले, “आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बँक ग्राहकांना नेहमीच चांगल्या प्रकारे दराच्या बाबतीत सकारात्मक राहते.

या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा होईल.कमी व्याज दरामुळे, बँक ऑफ बडोदाचे होमलोन आता 31 डिसेंबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी स्पर्धात्मक दरांवर उपलब्ध आहेत, असेही सोलंकी म्हणाले.

Comments are closed.