महामार्गाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी ट्रान्समिशन सिस्टम बनवणारी कंपनी कॅरारो इंडिया लिमिटेडतर्फे 1,812 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी प्रस्ताव दाखल
ट्रॅक्टर आणि महामार्गाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वापरली जाणारी अवजड वाहने आणि कृषी आणि बांधकाम उपकरणांसाठी विविध ट्रान्समिशन यंत्रणा बनवणाऱ्या पुण्याच्या कॅरारो इंडिया लिमिटेडने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) व्दारे भांडवल उभारणीसाठीचा प्रस्ताव (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस-डीआरएचपी) भांडवली बाजाराचे नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला सादर केला आहे.
प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये असणारा हा आयपीओ कॅरारो इंटरनॅशनस एसईतर्फे 1,811.65 कोटी रुपयांसाठी संपूर्ण हिस्सा विक्रीचा प्रस्ताव (ओएफएस) आहे.
भांडवलविक्रीचा हा प्रस्ताव बुक-बिल्डींग प्रक्रियेव्दारे सादर केला जात असून यात पात्रताधारक संस्थांत्मक खरेदीदारांसाठी एकूण समभागांपैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही, तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी किमान 15 टक्के तर रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी प्रस्तावाच्या किमान 35 टक्के हिस्सा वाटपासाठी उपलब्ध राहील.
कॅरारो एस. पी. ए. ची उपकंपनी असलेल्या कॅरारो इंडियाची स्थापना 1997 मध्ये करण्यात आली असून 1999 मध्ये कंपनीने ट्रान्समिशन सिस्टीमचे तर 2000 मध्ये अॅक्सलच्या उत्पादनास सुरूवात केली. कॅरोरा समूहातील अन्य संस्थांकडून प्रदान करण्यात आलेल्या आयपी हक्कांचा वापर करुन कंपनीने आपले उत्पादन सुरु केले आणि यंत्रसामुग्रीच्या मूळ उत्पादक ग्राहकांसाठी अतिशय अवघड आणि अव्वल दर्जाची अभियांत्रिकी उत्पादने आणि पर्याय विकसित करण्यात नैपुण्यता प्राप्त केलेली आहे. कंपनी सध्या कृषी ट्रॅक्टर आणि बांधकाम वाहनांसाठी अॅक्सल आणि ट्रान्समिशन यंत्रणा तयार करण्यावर केंद्रीत असून स्वतंत्र्यरित्या टीअर वन पुरवठादार आहे.
कॅरोरा इंडियाच्या संचालक मंडळाचे नेतृत्व इत्तोर फ्रान्ससेस्को सेक्वॉय हे करत असून ते अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक आहेत; तसेच 1992 पासून करोरा समूहासोबत असलेले आणि कंपनीच्या व्यवसाय आणि धोरणात्मक बाजारपेठेतील स्थितीला आकार देण्यात मूलभूत भूमिका बजावणारे संचालक आणि उपाध्यक्ष टोमॅस्को कॅरोरा हेही संचालक मंडळात आहेत. मंडळातील इतर सदस्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक बालाजी गोपालन, मुख्य वित्तीय अधिकारी डेव्हिड ग्रोसी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुधेंद्र मण्णीकर, बिगर-कार्यकारी संचालक एनरिको गोमिएरो आणि अँड्रिया कॉन्शेटो आणि स्वतंत्र संचालक म्हणून उमा मांडवगणे आणि किशोर सालेतोरे यांचा समावेश आहे.
कॅरारो ग्रुप हा भारतातील कृषी ट्रॅक्टर आणि बांधकाम वाहन उद्योगांमध्ये ट्रान्समिशन सिस्टीमसाठी टीयर वन पातळीचा प्रमुख स्वतंत्र पुरवठादार तर एक्सलसाठी प्रमुख पुरवठादार आहे. याव्यतिरिक्त, 150HP क्षमतेच्या ट्रॅक्टरपासून ते चार-चाकी ड्राइव्ह क्षमता असलेल्या वाहनांपर्यंत ट्रान्समिशन सिस्टीम प्रदान करण्यात कंपनीने स्वतःला बाजाराची प्रमुख कंपनी म्हणून स्थापित केलेले आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, कॅरारो इंडियाच्या डिझाइन क्षमता कॅरारो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CTIPL) आणि कॅरोरो समूहातर्फे प्रदान केल्या गेल्या आहेत. तथापि, 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयपी अधिकारांचे हस्तांतरण आणि जून 2024 मध्ये CTIPL च्या संपादनामुळे कंपनी आता आपल्या ग्राहकांना एकत्रित डिझाइनची सेवा पुरविते आणि त्यामुळे कंपनीची भारतातील स्पर्धात्मक पातळीरील स्थिती अतिशय मजबूत झाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 1997 मध्ये निर्यात केलेल्या जवळपास सर्व उत्पादनांमधून देशांतर्गत बाजारपेठेत आपला व्यवसाय वाढवत नेला आहे. आर्थिक 2024 मध्ये देशांतर्गत विक्रीतून कंपनीला अंदाजे 64.82 टक्क्य़ांपर्यंत उत्पन्न मिळालेले आहे.
कंपनीची उत्पादने ही त्याच्या ग्राहकांच्या अंतिम उत्पादनांचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. या उत्पादनात विविध ऑफ-हायवे वाहने, गियर्स, शाफ्ट्स आणि औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह वाहनांसाठी रिंग गियर यांचा समावेश आहे. कंपनीच्या विस्तृत उत्पादनाच्या श्रेणीमध्ये बॅकहो लोडर, माती कॉम्पॅक्टर्स, क्रेन, सेल्फ-लोडिंग काँक्रीट मिक्सर आणि लहान मोटर ग्रेडरसह कृषी ट्रॅक्टर आणि बांधकाम वाहनांच्या श्रेणीसाठी एक्सेल आणि ट्रान्समिशन सिस्टम आदींचा समावेश आहे.
त्याच्या DRHP मधील बाजार अहवाल आणि बाजारातील माहितीनुसार, कृषी ट्रॅक्टर आणि बांधकाम वाहन घटकांच्या बाजारपेठेत कॅरारो समूह अग्रणी आहे. कंपनीला समर्पित संशोधन आणि विकास (R&D) टीमचे पाठबळ लाभलेले आहे. कॅरारो समूह गेली 27 वर्षे भारतात कार्यरत असताना, उपकंपनी कॅरारो इंडियाने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक आणि पुरवठादारांचे विस्तृत असे जाळे विकसित केले आहे. कंपनीने बाजारपेठेत लवकर केलेल्या प्रवेशामुळे तिला सखोलपणे बाजारपेठ समजून घेणे, ग्राहकांच्या गरजा ओळखणे आणि कायमस्वरुपी संबंध निर्माण करणे शक्य झाले आहे. 2023 पर्यंत, कंपनी कृषी ट्रॅक्टर ट्रान्समिशनसाठी असलेल्या बाजाराच्या नॉन-कॅप्टिव्ह सेगमेंटमध्ये एकमेव अग्रगण्य पुरवठादार कंपनी म्हणून ओळखली जात आहे. तर नॉन-कॅप्टिव्ह बांधकाम वाहनांसाठीच्या ट्रान्समिशन मार्केटमध्ये 60-65 टक्के हिश्शासह बाजाराची अग्रणी कंपनी म्हणून उदयास आली आहे.
कॅरारो ग्रुपतर्फे दिल्या जात असलेल्या सर्वसमावेशक सेवा पर्यायांवरही अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे आणि या पर्यायांमुळेच कॅरारो इंडियाला भारतीय बाजारपेठेत वेगळे स्थान मिळालेले आहे. सुरुवातीच्या डिझाइन आणि ग्राहक अनुकूल धोरणापासून ते यांत्रिक खरेदी, उत्पादन, पुरवठा शृंखला व्यवस्थापन, वितरण आणि विक्रीनंतरची सेवा या घटकांमुळे एक अखंड, विविधांगी अनुभव प्रदान करण्याची क्षमता हा कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण फरकरुपी घटक ठरला आहे.
कॅरारो इंडिया पुण्यात दोन उत्पादन प्रकल्प चालवते: एक ड्राईव्हलाइनसाठी आणि एक गीअर्ससाठी. कास्टिंग, मशिनिंग, असेंब्ली, प्रोटोटाइपिंग, टेस्टिंग, पेंटिंग आणि हिट ट्रिटमेंट यासाठी हे प्रकल्प प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. आथिर्क वर्ष 2024 साठी ड्राईव्हलाइन उत्पादन प्रकल्पाची क्षमता 81.07 टक्के तर गियर्स उत्पादन प्रकल्पाची क्षमता 89.94 टक्के होती.
कंपनीने 31 मार्च 2024 पर्यंत भारतातील 38 उत्पादकांना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा उत्पादकांना पुरवठा केला आहे. त्याच्या प्रमुख ग्राहकांमध्ये मोठे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ओईएम समाविष्ट आहेत आणि त्याच्यांबरोबरच दीर्घकालीन संबंध किमान 15 वर्षे टिकतात. कॅरारो आशियातील ग्राहकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तसेच आशिया बाहेरील ग्राहकांना कॅरारो ड्राईव्ह टेक इंडिया ए.पी.ए. द्वारे निर्यात करते. कृषी ट्रॅक्टर क्षेत्रातील प्रमुख ग्राहकांमध्ये सीएनएच, टाफे, महिंद्रा आणि महिंद्रा, जॉन डीरे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एस्कॉर्ट्स कुबोटा, ॲक्शन कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड यांचा समावेश आहे. बांधकाम वाहन क्षेत्रात, ते सीएनएच, बुल मशीन्स, लियुगॉन्ग, मॅनिटो इक्विपमेंट, डूसान, एस्कॉर्ट्स कुबोटा, महिंद्रा आणि महिंद्रा आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना सेवा देते. याव्यतिरिक्त, सीएनएच हा इतर क्षेत्रातील प्रमुख ग्राहक आहे.
कॅरारो इंडियाने भारतातील कृषी ट्रॅक्टर आणि बांधकाम वाहन उद्योगात व्यापक कौशल्य विकसित केले आहे आणि भारतातील 8 राज्यांमध्ये 189 पुरवठादारांचे तर 68 आंतरराष्ट्रीय पुरवठादारांचे जाळे विकसित केलेले आहे. कंपनीचे अग्रणी 10 पुरवठादार सरासरी 15 वर्षांपासून कंपनीबरोबर कार्यरत आहेत.
मुख्यतः उत्पादनांच्या विक्रीतून झालेल्या महसुलात वाढ झाल्यामुळे कॅरारो इंडियाचा महसूल 2023 मधील ₹ 1,695.12 कोटींवरून 4.44 टक्क्याने वाढून आर्थिक वर्ष 2024 मध्ये ₹ 1,770.45 कोटी झाला आहे, तर करानंतरचा नफा वित्तीय वर्ष 23 मध्ये ₹ 46.80 कोटींवरून 29.44 टक्क्यांनी वाढून वित्तीय वर्ष 24 मध्ये ₹ 60.58 कोटी झाला.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी परिबा आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
Comments are closed.