स्टँप ड्यूटीची वाढ निष्प्रभ! मुंबईत घर खरेदी जोमात

Despite the rollback of the stamp duty in Maharashtra, as many as 8,576 units were registered in Mumbai

महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील स्टँप ड्युटी मागे घेतल्यानंतरही, मुंबईत तब्बल 8,576 नवीन युनिट्सची नोंदणी झाली, जी सप्टेंबरच्या तुलनेत 10% जास्त आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 8% जास्त झाली.

ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत, ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदणी 48% नी वाढली. सदर नोंदणीद्वारे प्राप्त झालेला एकूण सरकारी महसूल 550 कोटी जमा झाला, जो 136% जास्त आहे.

दरम्यान, आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की, ऑक्टोबर 2020 मध्ये स्टँप ड्युटी मर्यादित कालावधीसाठी 2% दराने आकारली जात होती तर आता स्टँप ड्युटी 5% दराने आकारली जात आहे. ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत जास्त स्टँप ड्युटी असूनही, ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदणींमध्ये 8% वाढ झाली आहे, असे प्रॉपस्टॅकने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईत 11,000 कोटींहून अधिक किमतीची ॲसेट विकली गेली, जी सप्टेंबर 2021 च्या तुलनेत 4% जास्त आहे. परंतू ऑक्टोबर 2020 मध्ये विकल्या गेलेल्या 11, 640 कोटी रुपयांच्या ॲसेटच्या तुलनेत ही 5% घट आहे.

प्रॉपस्टॅकचे सह-संस्थापक संदीप रेड्डी यांनी सांगितले, “सध्या मुंबईच्या बाजारपेठेत चांगलीच तेजी दिसून येत आहे.ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत मागणी वाढली आहे”.

नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया म्हणाले, “निवासी मालमत्तेच्या नोंदणीत भरपूर वाढ झाली आहे. स्टँप ड्युटी मध्ये वाढ होत असूनही मागणी वाढतच चालली आहे.

रुणवाल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक, संदीप रुणवाल म्हणाले, “काही डेव्हलपर्सनी सणासुदीच्या मुहूर्तावर त्यांचे नवीन प्रोजेक्ट लॉन्च केले असताना ते अनेक आकर्षक किंमती आणि फ्लेक्सी-पेमेंट प्लॅन ऑफर करत आहेत. होमलोनवरील कमी व्याजामुळे एंड यूजर इंटरेस्ट वाढला आहे.

Comments are closed.