इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी ३० सप्टेंबरची वाट बघू नका
It is advised to file your income tax return as early as possible to avoid last minute rush
सध्या भारतातले सगळेच नोकरदार इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याच्या गडबडीत आहेत. मात्र जेव्हा अनेक करदात्यांनी ३१ जुलै नंतर आयटीआर रिटर्न फाईल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना लेट फी भरण्यास सांगितले गेले. मात्र आता इन्कम टॅक्स पोर्टलमधील हा दोष काढून टाकण्यात आला असून करदात्यांना कोणतीही लेट फी भरण्याची गरज नाही. मात्र इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग ३० सप्टेंबरच्या आधी करावे लागेल.
असे असले तरी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहण्याऐवजी आताच रिटर्न दाखल करणे फायदेशीर ठरेल. का ते जाणून घ्या.
दंडात्मक व्याज टाळा –
तुम्हाला आर्थिक वर्षाच्या अखेरीस तुमचा एकूण कर भरावा लागतो,नाहीतर थकबाकी मुळे दंडात्मक व्याज घेतले जाते. टॅक्समन चे DGM नवीन वाधवा याबाबत म्हणाले की, “CBDT ने रिटर्न फाईल करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. मात्र जर तुमची टॅक्स लायबिलिटी १ लाखापेक्षा जास्त असेल आणि रिटर्न वेळेत फाईल नाही केला तर कलम २३४A अंतर्गत भराव्या लागणाऱ्या व्याजातून सवलत मिळत नाही. हे व्याज दर महिन्याला १ टक्का या दराने आकारले जाते.
कलम २३४A नुसार इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यास विलंब झाला तर संबंधित व्यक्तीस दंड आकारला जातो. म्हणजेच, जर तुम्ही अद्याप तुमचा रिटर्न फाईल केला नसेल आणि जर तुमची टॅक्स लायबिलिटी १.५ लाख रुपये असेल, तर तुम्हाला रिटर्न फाईल करेपर्यंत १५०० रुपये व्याज भरावे लागेल. तथापि, काही तज्ञांचे असे मत आहे की सरकारने थकीत करांवरील व्याजातही सूट दिली पाहिजे.
रिटर्न आणि रिफंडची जलद प्रक्रिया –
एकदा तुम्ही तुमचा रिटर्न फाईल केला की आयटी विभाग उपलब्ध माहितीची क्रॉस चेकींग करून त्याचे प्रोसेसिंग करते. रिटर्नची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर,करदात्याला रिटर्न प्रोसेस झाला अशा आशयाची नोटीस दिली जाते.
जर करदात्याने दाखल केलेल्या रिटर्नमध्ये आणि सरकारकडे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये तफावत असेल तर नोटीसमध्ये ते नमूद केले जाते. तसेच याबाबत दुरुस्ती किंवा स्पष्टीकरण मागितले जाते. जर सर्व योग्य असेल तर रिफंड दिला जातो. यास आठवडा किंवा महिना लागू शकतो. वाधवा म्हणाले, “गेल्या वर्षी असे दिसून आले होते की ज्या लोकांनी त्यांचे रिटर्न लवकर दाखल केले होते आणि ज्यांचे बँक खाते आयकर पोर्टलवर प्री-वॅलिटेड होते त्यांना वेळेवर रिफंड मिळाला.”
शेवटच्या क्षणाची घाई टाळा बऱ्याचदा तांत्रिक अडचणींमुळे इन्कम टॅक्स पोर्टलच्या कामकाजावर परिणाम होतो. करदात्यांना आणि व्यावसायिकांना कर-संबंधित कामे करणाऱ्या लोकांना याचा फटका बसतो. रिटर्न भरण्याच्या अंतिम मुदतीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये लोकांना या अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच आयटीआर लवकर दाखल करण्याचा सल्ला दिला जातो.
Comments are closed.