इंडिगोची युएई उड्डाणे २४ ऑगस्ट पर्यंत बंद, आज स्टॉकवर परिणाम दिसणार का?

The airline though has said that it is due to operational issue

इंडिगो कंपनीच्या विमान उड्डाणांवर यूएई सरकारने एका आठवड्यासाठी  बंदी घातली आहे. डिपार्चरच्या वेळी विमानतळावर प्रवाशांची अनिवार्य असलेली आरटी-पीसीआर चाचणी न घेतल्याने ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. इंडिगोने याची पुष्टी करताना,ऑपरेशनल समस्यांमुळे यूएईला जाणारी इंडिगोची सर्व उड्डाणे २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत असं सांगितलं.

इंडिगोने सांगितले, की आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना सूचित केले आहे की पुन्हा उड्डाणे सुरू झाल्यानंतर त्यांना प्रवास करू दिला जाईल अथवा त्यांचे पैसे रिफंड केले जातील.

यूएई सरकारच्या सध्याच्या आरोग्यविषयक धोरणानुसार, प्रत्येक प्रवाशाने विमानात चढण्यापूर्वी सहा तास आधी विमानतळावर निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, नायजेरिया आणि युगांडामधील प्रवाशांसाठी कोविड -19 चाचणी अनिवार्य आहे. यूएई रेसिडन्स व्हिसा असलेल्या सर्व प्रवाशांना दुबईला जाण्याची परवानगी आहे.

बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा इंडिगोचा शेअर १६९५ रुपयांवर क्लोज झाला. आता या बातमीमुळे आणि जागतिक बाजारात झालेल्या पडझडीमुळे शेअरवर काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

Comments are closed.