जाणून घ्या रिलॅक्सो फुटवेअर या कंपनी बद्दलच्या काही खास गोष्टी

रिलॅक्सो फुटवेअर या कंपनीचा रिझल्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आला. कंपनीचा नेट प्रॉफिट, रेव्हेनु आणि इबीटडा सुद्धा डाउन झाला आहे. पण कंपनीची सुरुवात कशी झाली ते आधी पाहू.

कंपनी आत्ता फुटवेअर बनवणारी आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध असली तरी तिची सुरुवात सायकल साठी लागणारे पार्ट्स आणि फुटवेअर बनवणारी कंपनी म्हणून झाली होती. काही काळानंतर सायकल पार्ट्स बिझनेस फारसा नफा मिळवून देणारा नाही असे लक्षात आल्याने कंपनीचे सध्याचे प्रमोटर रमेश दुआ यांनी फक्त फुटवेअर वर लक्ष देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी रबर पासून चप्पल बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले आणि युकेमधील प्लास्टिक अँड रबर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. याच शिक्षणाचा वापर करून पुढे त्यांनी रिलॅक्सो ब्रँड निर्माण केला आणि वाढवत नेला.

आज घडीला रिलॅक्सो च्या चपलांची सरासरी विक्री किंमत फक्त 136 रुपये आहे

भारताच्या एकूण वार्षिक फुटवेअर प्रॉडक्शन कॅपॅसिटी पैकी 13 टक्के योगदान एकट्या रिलॅक्सो फुटवेअरचे असते. रिलॅक्सो आपल्या एकूण प्रॉडक्ट्स पैकी तब्बल 95 टक्के प्रॉडक्ट्स इन हाऊस बनवते. रिलॅक्सोचा मोठा स्पर्धक असलेली बाटा ही कंपनी आपले 50 टक्के प्रॉडक्शन आऊटसोर्स करते. कंपनी एका दिवसाला दहा लाखांपेक्षा जास्त स्लीपर्सचे जोड बनवते आणि वर्षाला जवळपास 18 कोटी चपला विकते.

याचा परिणाम कंपनीच्या रेवेन्यू वर देखील तसाच दिसून येतो. 2003 मध्ये कंपनीचा रेवेन्यू 150 कोटी रुपये होता जो 2013 मध्ये 1010 कोटींवर गेला आणि 2022 मध्ये 2600 कोटींवर गेला. कंपनीच्या शेअरने गेल्या सहा महिन्यांमध्ये अतिशय खराब कामगिरी केलेली आहे. कंपनीचा नुकत्याच संपलेल्या तिमाहीचा निकालसुद्धा फारसा चांगला नव्हता.

असे जरी असले तरी काही आकड्यांकडे नजर टाकली असता ते रिलॅक्सोसाठी सकारात्मक ठरू शकतात. जसे की भारतातील पर कॅपिटा फुटवेअर युज फक्त 1.9 एवढे आहे. अमेरिका युके यासारख्या विकसित देशांमध्ये हाच आकडा 7 एवढा आहे. भारतातील 65 टक्के फुटवेअर मार्केट अन ऑर्गनाईज्ड आहे. मात्र हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे. अन ऑर्गनाईज्ड मार्केटचा शेअर ८० टक्क्यांवरून कमी होत होत 65 टक्क्यांवर आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ब्रँडेड फुटवेअर कंपन्यांना त्याचा फायदाच होणार आहे.

असे जरी असले तरी रॉ मटेरियल ची वाढती किंमत, मॅन्युफॅक्चरिंगच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ, एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या चपलांवर वाढलेला जीएसटी दर (५% करून १२%) या आव्हानांचा सामना कंपनीला करावा लागणार आहे.

स्टॉक चा रिझल्ट तर चांगला नाहीच आला पण स्टॉक मागच्या एक वर्षांपासून टेक्निकली सुद्धा वीक आहे.  स्टॉक मागच्या १ वर्षात ५०% पडला आहे. स्टॉक ने ८०० चा स्ट्रॉंग सपोर्ट तोडला आहे आता स्टॉक ला ६२० चा चांगला सपोर्ट आहे. स्टॉक इथपर्यंत येऊ शकतो.

Comments are closed.