भारी! गेल्या १ वर्षात इन्व्हेस्टरला दुप्पट रिटर्न्स दिलेले ३ स्टॉक्स, पाहा कोणते?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमीटेड कंपनीचा स्टॉक सध्या ६३३ रुपयांवर ट्रेड करत आहे. २८ मार्च २०२२ रोजी हा स्टॉक २४१.१५ रुपयांना ट्रेड करत होता. गेल्या १ वर्षात हा स्टॉक १५६.२४ टक्केंनी वाढला आहे. ही कंपनी सबमरिन व युद्धनौका बांधणी व दुरुस्तीची कामे करते. या स्टॉकचा ५२वीक हाय ९३६.८५ राहिला आहे.

युको बॅंक २९ मार्च २०२२ रोजी ११.२५ रुपयांवर ट्रेड होत होता. सध्या हा स्टॉक २२.६ रुपयांवर ट्रेड होत आहे. हा स्टॉक गेल्या १ वर्षात १०३.८४ टक्केंनी वाढला आहे. ३८.२ हा या स्टॉकचा ५२वीक हाय राहिला आहे. या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये गेल्या एक वर्षात सातत्याने वाढ होत आहे.

वरुण बेव्हरेजेस ११०.५३ टक्केंनी गेल्या एक वर्षात वाढला आहे. २८ मार्च २०२२ रोजी हा स्टॉक ६२७.२५ रुपयांवर ट्रेड होत होता. सध्या हा स्टॉक १३५५ रुपयांवर ट्रेड होत आहे. या कंपनीचा नेट प्रॉफिट २०२१च्या तुलनेत २०२२ साली दुप्पट झाला आहे. पेप्सीको कंपनीची ही जगातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी फ्रंचाईजी आहे. तसेच बेव्हरेज सेक्टरमध्ये कंपनी मार्केट लीडर आहे.

Comments are closed.