विक्रमी कामगिरी: भारतातील ‘या’ मोटार कंपनीने निर्यात केल्या विक्रमी २५ लाख गाड्या

मारुती सुझूकी इंडिया लिमीटेडने २५ गाड्यांची निर्यात करण्याचा पराक्रम केला आहे. गुजरातमधील मुंड्रा पोर्टमधून मारूती बलिनो ही २५लाख नंबरची गाडी लॅटिन अमेरिकेकडे निर्यात झाली.

१९८६-८७ साली पहिल्यांदा मारुतीने पहिल्यांदा बांगलादेश व नेपाळला गाड्यांची निर्यात केली होती. १९८७ साली मारुतीने हंगेरी देशात ५०० गाड्या निर्यात केल्या.

सध्या मारुती सुझूकी १०० देशांत गाड्यांची निर्यात करते. यात आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया व आखाती देशांचा समावेश होतो.

Comments are closed.