ट्विटरच्या एलॉन मस्क यांनी बराक ओबामांचा तीन वर्ष जुना विक्रम मोडला, आता…
२०२० पासून बराक ओबामांच्या नावावर असलेला विक्रम एलॉन मस्क यांनी मोडला आहे. सर्वाधिक ट्विटर फॉलोवर्स असलेल्या व्यक्तींच्या यादीत मस्क १३३ मिलीयन फॉलोवर्ससह पहिल्या स्थानावर आले आहेत.
ट्विटरवर ४५० मिलीयन युझर्स ॲक्टिव आहेत, त्यातील तब्बल १३३ मिलीयन युझर्स मस्क यांना फॉलो करतात. जे एकूण युझर्सच्या ३० टक्के आहे.
एलॉन मस्क यांनी २१ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्विटर विकत घेतले होते. तेव्हा त्यांना ११० मिलीयन युझर्स फॉलो करत होते. केवळ ५ महिन्यात त्यांचे फॉलोवर्स २३ मिलीयनने वाढले आहेत. त्यावेळी ते बराक ओबामा व जस्टिन बिबरनंतर तिसऱ्या स्थानावर होते.
गेल्या ३० दिवसांत ओबामा यांना २६७५८५ तर जस्टिन बिबरला ११८९५० लोकांनी अनफॉलो केले आहे. मस्क यांनी याच काळात ३ मिलीयन फॉलोवर्स मिळवले आहेत. दिवसाला सरासरी १,००,००० लाख लोकं त्यांना फॉलो करतात.
५१ वर्षीय मस्क यांनी २०२२मध्ये ट्विटर ४४ बिलीयन डॉलरला विकत घेतला होता. डिसेंबरमध्ये त्यांनी ट्विटरचं सीईओपद सोडण्यासाठी पोल घेतला होता. त्यात १७.५ मिलीयन लोकांनी (५७.५ टक्के) होकार दिला होता.
२०१० सालापासून सर्वाधिक फॉलोवर्सचा ट्रॅक ठेवण्यास सुरुवात झाली. २०१०मध्ये Ashton Kutcher यांच्या नावावर तो विक्रम होता. १ मिलीयन फॉलोवर्स होणारे ते पहिले ट्विटर युझर्स देखील होते.
त्यानंतर २०१०च्या उत्तरार्धात लेडी गागाकडे हा ताज आला. जस्टिन बीबर व लेडी गागा यांच्यात अनेक वर्ष पहिल्या स्थानासाठी फाईट सुरु राहिली व २०१४मध्ये केटी पेरीने ५२.४ मिलीयन फॉलोवर्ससह पहिला नंबर मिळवला.
त्यानंतर केटी पेरी २०२० पर्यंत पहिल्या स्थानावर राहिली. याच काळात १०० मिलीयन फॉलोवर्सचा टप्पा पार करणारी ती पहिली व्यक्ती ठरली. त्यानंतर २०२० साली बराक ओबामा यांनी सर्वाधिक फॉलोवर्समध्ये अव्वल स्थान पटकावले. ते तीन वर्ष पहिल्या स्थानी राहिले.
Comments are closed.