पुण्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मेटाचे पाठबळ
जागतिक पातळीवरील फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सअँपची पालक कंपनी असलेल्या मेटा या आघाडीच्या प्लॅटफॉर्मने महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वृद्धीत हातभार लावण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली. भारतातील मेटाचे संचालक आणि लघु व्यवसाय समूहाचे प्रमुख विकास पुरोहित यांनी देशातील छोट्या व्यवसायांना डिजिटल
कायापालट करण्यात मेटाची भूमिका स्पष्ट केली. उद्योग मंत्रालयाच्या निष्कर्षानुसार मागील काही वर्षात अनेक स्त्रिया ह्या आपल्या व्यवसायासाठी मेटाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवसायवृद्धी करत आहेत. यामार्फ़त महिलासक्षमीकरण आणि सबलीकरणास देखील मदत होत आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वार्षिक अहवाल २०२२-२३ अनुसार, राज्यात ४७.७८लक्ष एमएसएमई आहेत, ज्यातून ९० लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळत आहे. मेटाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापरकरून व्यवसायिकांना विपणन, संकेतस्थळ बनविणे आपला व्यवसाय डिजिटल करणे, अशा महत्वपूर्ण बाबी अतिशयसहजरित्या उपलब्ध झालेल्या आहेत व त्यातून व्यवसायवृद्धी वाढीस लागत आहे.आज, जगभरात २०० दशलक्ष पेक्षा जास्त व्यवसाय व्हॉट्सअँप बिझनेस अँपचा उपयोग करत आहेत. आणिभारतातील व्हॉट्सअँप वापरणाऱ्या लोकांपैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक बिझनेस खात्यात मेसेज करत असतात.
कॅटलॉग आणि क्विक रिप्लाईजसारख्या फीचर्समुळे हे अँप लघु उद्योगांना जुन्या इन्क्वायरीजचा माग ठेवण्यास,ग्राहकांच्या विनंतीचे व्यवस्थापन करण्यास आणि विक्री करण्यास सहज सक्षम बनवते. क्लिक-टू-व्हॉट्सअँप जाहिराती मेटा अँपच्या एकत्रित सामर्थ्याचा फायदा घेतात आणि व्यवसायासाठी नवीन ग्राहक शोधण्यासाठीचा हा एक प्रभावी मार्ग आहे. यामुळे जगभरातील अनेक लघु व्यवसाय आपले संपूर्ण काम व्हॉट्सअँप वर चालवण्यासाठी, त्यांचे फेसबुकअकाऊंट नसताना देखील थेट व्हॉट्सअँप बिझनेस अँपमध्ये फेसबुक किंवा इन्स्टाग्राम जाहिराती बनवण्यास, खरेदीकरण्यास सक्षम होत आहेत.
मेटाचे भारताचे संचालक आणि लघु व्यवसाय समूहाचे प्रमुख विकास पुरोहित म्हणाले की , “गेली अनेक वर्षे आम्हीलघु व्यवसायांच्या विशेष गरजा भागवणारी उत्पादने, सोल्यूशन्स आणि प्रोग्राम तयार करून लघु व्यवसायांच्यावृद्धीसाठी मदतरूप होण्यात आघाडीवर आहोत. आपल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील व्यवसायज्याप्रकारे व्हॉट्सअँपचा उपयोग करत आहेत, त्याला प्रचंड वेग मिळालेला दिसत आहे. राज्यातील अनेकव्यवसायांसाठी, व्हॉट्सअॅप हा त्यांचा व्यवसाय आहे – हीच त्यांची वेबसाइट आहे आणि हाच त्यांचा डिजिटल स्टोअरआहे. डिजिटल वातावरणात विकसित होण्यास या व्यवसायांना मदत करण्यासाठी आम्ही त्यांना उपयुक्त अशी साधनेनिर्माण करत राहू.
पुण्यातील बनाव या व्यवसायाच्या संस्थापिका अदिती गर्ग म्हणाल्या की, “मी २०२१ मध्ये कोणत्याही वेबसाइटशिवाय ‘बनाव’ची सुरुवात केली आणि मला पहिला ऑर्डर मिळाला तो इन्स्टाग्रामवरून. बनाव दुप्पट वेगाने
वाढत आहे आणि आज आमची ८०टक्के विक्री ही मेटा अँप्सने प्रभावित आहे. आमच्यासारख्या नवीन व्यवसायाला विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअँपची मदत होते. खास करून क्लिक-टू-व्हॉट्सअँप जाहिराती ‘बनाव’च्या ग्राहकांना व्हॉट्सअँप कॅटलॉगकडे रिडायरेक्ट करतात आणि लागलीच त्यांच्या समस्यांची पूर्तता करून मदतरूप होतात.”
ग्लिट्झ अँड ग्लॅमबाय दीप्तीच्या संस्थापिका दीप्ती महाजनी म्हणाल्या की , “अवघ्या काही महिन्यांत, दर महा मला मिळणाऱ्या ऑर्डर्सची संख्या दुपटीने वाढली आहे. माझ्याकडे वेबसाइट नाही, पण मी देशभरातून लीड्स मिळवण्यासाठी व्हॉट्सअँपचा उपयोग करते.”
Comments are closed.