तुमची बचत न मोडता आर्थिक वर्ष २०२४ साठी विमा धोरणाची बांधणी; फोनपे इन्श्युरन्स ब्रोकिंग सर्विसेस

आर्थिक शिस्त ही संपत्ती जमा करण्यासाठी यशस्वी गुरुकिल्ली आहे. सुरक्षित गुंतवणूकीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी पद्धतशीरपणे शिस्त ही महत्वाची आहे. जेव्हा आपण विम्याकडे “खर्च” ऐवजी धोरणात्मक गुंतवणूक म्हणून पाहतो, तेव्हा आपल्याला अनिश्चितता, आणीबाणी किंवा आरोग्यसेवा खर्चाच्या वेळी आपली बचत कमी करावी लागत नाही कारण आपण आधीच विमा काढलेला असतो. याव्यतिरिक्त , सुसज्ज आर्थिक योजनेसाठी सज्जता महत्त्वाची आहे. जेव्हा आपण तयार असतो, तेव्हा संपत्ती निर्माण करण्यावर केंद्रित गुंतवणूक आणि विमा खरेदी दोन्हीही एकाचवेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय केली जाऊ शकते तसेच आरोग्य आणि जीवन विमा ८० डी आणि ८० सी अंतर्गत कर लाभ देखील प्रदान करतात.

फोनपे इन्श्युरन्स ब्रोकिंग सर्विसेसचे कार्यकारी अधिकारी विशाल गुप्ता म्हणाले, आम्ही भारतीयांना ‘त्यांच्या बचती’ प्रभावीपणे वाचवण्यात मदत करण्यासाठी लक्ष केंद्रित करतो. भारतात भौतिक मालमत्ता आणि बँकांमधील मुदत ठेवीं यासारख्या गुंतवणुकींना मिळणारी पारंपारिक पसंती हळूहळू म्युच्युअल फंड आणि स्टॉक यासारख्या वित्तीय मालमत्तांमधील गुंतवणुकीकडे वळली आहे. नवीन वर्षाचे आगमन होत असताना गुंतवणुकीचे नियोजन करताना त्यातील विम्याच्या भूमिकेची सखोल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

आरोग्य, जीवनशैली आणि गुंतवणुकीच्या वचनबद्धतेच्या आधारावर पुरेसे आरोग्य विमा कवच असल्याची नेहमी खात्री करणे गरजेचे आहे . तसेच महत्त्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय महागाई आणि सध्याच्या आणि भविष्यातील वैद्यकीय खर्चावर आधारित आरोग्य विमा कवच योग्य प्रमाणात आहे याची खात्री करणेआवश्यक आहे.

तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या कुटुंबाच्या जीवनशैलीतील स्थिरता सुनिश्चित करून टर्म प्लॅन बहुमोल ठरतात. आदर्शपणे, तुमच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट कव्हरेज किंवा कमीत कमी, लोन, कर्जे, आणि जीवनशैलीवरील खर्च यासारख्या कोणत्याही थकीत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेसे असलेले विमा कव्हरेज निवडण्याची शिफारस केली जाते. तुम्ही आगामी वर्षात टर्म प्लॅनसाठी साइन अप करत असाल किंवा तुमच्या सध्याच्या विमा कव्हरेजमध्ये आणखी भर घालत असाल तरीही, दुर्दैवी परिस्थितीमुळे संभाव्य आर्थिक भाराच्या प्रभावापासून तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी विमा कव्हरला त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीशी संरेखित करणे महत्त्वाचे आहे.

भूतकाळात, माहितीच्या अभावामुळे आणि इतर दस्तऐवजीकरण समस्यांमुळे विमा खरेदी करणे अनेकदा कठीण होते. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी विमा ऑफर सर्वांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी बरेच बदल घडवून आणत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, विमा उत्पादने समजण्यास सोपी, खरेदी करण्यास सोपी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर सर्व गोष्टींपेक्षा एखाद्याच्या गरजांना प्राधान्य देणारे योग्य असलेले सर्वोत्तम उत्पादन देणे महत्त्वाचे असेल.

Comments are closed.