कॅशफ्री पेमेंट्सना आरबीआयकडून पेमेंट एग्रीगेटर परवाना प्राप्त; संपूर्ण भारतात व्यापाऱ्यांचे ऑनबोर्डिंग सुरू
कॅशफ्री पेमेंट्स, भारतातील आघाडीची पेमेंट कंपनी आणि एपीआय बँकिंग कंपनीने घोषणा केली आहे की, भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय- RBI) कडून पेमेंट एग्रीगेटर परवाना प्राप्त करणार्या पहिल्या पेमेंट सेवा प्रदात्यांपैकी एक बनली आहे. कॅशफ्री पेमेंट्सने देशभरातील व्यापाऱ्यांसाठी ऑनबोर्डिंग खुली आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आरयबीआय कडून पेमेंट एग्रीगेटर (PA) परवाना सुरक्षित करणे हा कॅशफ्री पेमेंट्ससाठी एक महत्त्वाची बाब आहे, ज्याचे पालन करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे आणि सु-नियमित पेमेंट लँडस्केपचे महत्त्व अधोरेखित करण्यावर आमचा भर आहे. आम्ही आता नवीन व्यापार्यांना आमच्या वेबसाइटवर पेमेंट गेटवे साठी ऑनबोर्ड करत आहोत. आम्ही आमच्या प्रवासाच्या या नवीन टप्प्याबद्दल खूप उत्सुक आहोत, जिथे आमची वाढ तेजीत सुरू आहे आणि पेमेंट्स स्पेसमध्ये आमचे मार्केट लीडरशिप पसंतीचे एग्रीगेटर म्हणून कायम आहे.”
सध्या, कॅशफ्री पेमेंट ३,००,००० पेक्षा जास्त व्यवसायांना पेमेंट कलेक्शन, पेआउट्स, मोठ्या प्रमाणात परतावा, खर्चाची परतफेड, लॉयल्टी आणि रिवॉर्ड्स उत्पादन ऑफरसह सक्षम करत आहे. गेल्या एका वर्षात ओळख पडताळणी, एस्क्रो व्यवस्थापन, बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल BNPL), ऑर्केस्ट्रेशन प्लॅटफॉर्म आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट्सवर अनेक उत्पादने लाँच केली आहेत.
कॅशफ्री पेमेंट्स हे आघाडीच्या ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर्सपैकी एक आहे आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअरसह भारतातील मोठ्या प्रमाणात वितरणातही आघाडीवर आहे. भारतातील सर्वात मोठ्या कर्जदार, एसबीआय ने कॅशफ्री पेमेंट्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि एक मजबूत पेमेंट इकोसिस्टम तयार करण्यात कंपनीची भूमिका अधोरेखित केली आहे. कॅशफ्री पेमेंट्स कंपनीच्या उत्पादनांना सामर्थ्य देणारी कोर पेमेंट आणि बँकिंग पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सर्व आघाडीच्या बँकांसोबत काम करते. कॅशफ्री पेमेंट हे शॉपीफाय (Shopify), डब्लूआयएक्स ( Wix), पेपाल (Paypal), अमेझॉन पे ( Amazon Pay), पेटीएम ( Paytm) आणि गुगल पे (Google Pay) सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मसह एकत्रित काम करत आहे. भारताव्यतिरिक्त, यूएसए( USA), कॅनडा आणि यूएई(UAE) सह इतर आठ देशांमध्ये कॅशफ्री पेमेंट्स सोल्यूशन्स वापरले जात आहेत.
Comments are closed.