सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील नवक्रांतीसाठी इलेव्हेट एज आणि मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च एकत्र

पुणे, 29 एप्रिल | इलेव्हेट एज सेमीकॉन कंसल्टन्सी प्रायव्हेट लिमीटेड आणि मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमीटेड कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे. याद्वारे दोन्ही कंपन्या एकत्र येत मार्केट रिसर्च व कंसल्टन्सी इंडस्ट्रीमध्ये जगभरात काम करणार आहेत.

या स्टॅटजीकल पार्टनरशीपमधून दोनही कंपन्या सेमीकंडक्टर सेक्टरमधील मार्केट रिसर्च आणि ग्रोथ कंसल्टन्सी जगभरात पुरवणार आहे. यामध्ये इलेव्हेट एजकडे असलेल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील अनुभवाचा तसेच मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च कंपनीकडे असलेल्या मार्केट इनसाईट्स आणि ॲनालिसीसचा उपयोग होणार आहे. एकत्र येत सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी दोन्ही कंपन्या सर्वसमावेशक मार्केट रिपोर्ट्स, नविन संधी तसेच सेक्टरमधील स्पर्धा यांचे स्थानिक व जागतिक पातळीवर काम करणार आहे.

मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमीटेड (www.maximizemarketresearch.com) ही रिसर्च आणि कंसल्टेशनमधील एक दिग्गज कंपनी समजली जाते. जगभरातील ४५ देशांमध्ये या कंपनीचे ॲनालिसीस व रिपोर्ट्सचा वापर केला जातो. अतिशय तज्ञ अशा लोकांची टीम मॅक्झिमाईजकडे असून, कंपनी वेगवेगळ्या सर्वच क्षेत्रात काम करते. त्यात इंजीनिअरिंग इक्व्युपमेंट्स, कन्झुमर गुड्स, सेवा, आयटी तसेच हेल्थकेअर, लाईफ सायन्स अशा सेक्टरचा समावेश होतो. कंपनीसोबत ४००पेक्षा जास्त रिसर्च असोसिएसट्स आणि ॲनालिस्ट काम करत असून जागतिक स्तरावर एक नामांकित कंपनी म्हणून कंपनीची ख्याती आहे.

इलेव्हेट एज सेमीकॉन कंसल्टन्सी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीची स्थापना सेमीकंडक्टर इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इलेक्ट्रिकल व्हेईकल इंडस्ट्री आणि कनेक्टर इंडस्ट्रीमधील अनुभवी अशा व्यक्तींनी केली आहे. इलेव्हेट एज अनुभवी टीमच्या जोरावर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कंपनी काम करत आहे. या क्षेत्रात टेक्नीकल कंसल्टेशन, मर्जर किंवा ॲक्विजीशन अशा वेगवेगळ्या गोष्टींवर कंपनी काम करते. क्लायंटसाठी बीझनेस ग्रोथच्या नव्या संधी शोधण्याची व त्यासाठी बेसिक स्ट्रक्टर उभं करण्याच काम इलेव्हेट एज करते.

सामंजस्य करारावेळी मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमीटेडचे चेअरमन रमेश अगावणे म्हणाले, ‘आम्हाला सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना जागतिक दर्जाचे बनण्यासाठी चांगल्या सेवा द्यायच्या आहेत. तसेच यासाठी आम्ही इलेव्हेट एजबरोबर कटिबद्ध आहोत.’
कंपनीचे सीईओ विकास गोडगे यावेळी म्हणाले, ‘दोनही कंपन्याचे एकत्र येणे हे मार्केट रिसर्च व इंडस्ट्री नॉलेजमध्ये नवी क्रांती आणेल. एकत्र आम्ही नवीन संधी तर शोधूच परंतू या क्षेत्रात काय नाविण्यपुर्ण करता येईल यासाठीही काम करु.’

इलेव्हेट एजचे डायरेक्टर संजय झिंजाड हे यावेळी बोलताना म्हणाले, ‘आमच्या दोघांची बलस्थाने ही नक्कीच आमच्या क्लायंट्सला फायद्याची ठरतील. याद्वारे ते येणारी आव्हाने, संधी यावर चांगले काम करतील व एक शाश्वत विकास करतील.’

Comments are closed.