ओला इलेक्ट्रिक – विक्री पासून फायनान्सपर्यंत सगळी माहिती एकाच ठिकाणी
Delivery for the electric scooter will start from October 2021
ओला इलेक्ट्रिकने ७ सप्टेंबर रोजी एका निवेदनात म्हटले आहे, की S1 स्कूटरसाठी EMI दरमहा २९९९ रुपयांपासून सुरू होईल.
“जर तुम्हाला फायनान्सची गरज असेल तर,OFS (ओला फायनान्शियल सर्व्हिसेस) ने आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी आणि टाटा कॅपिटलसह काही आघाडीच्या बँकांशी करार केला आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या गाडीला फायनान्स मिळवू शकता. ”
ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरची ऍडव्हान्स व्हर्जन असलेल्या ओला S1 प्रो साठी ईएमआय ३१९९ रुपयांपासून सुरू होईल.
कंपनीने म्हटले आहे की, एचडीएफसी बँक पात्र ग्राहकांना ओला आणि ओला इलेक्ट्रिक ॲप्सवर काही मिनिटांत कर्ज मंजूर करेल. तसेच टाटा कॅपिटल आणि आयडीएफसी फर्स्ट बँक डिजिटल केवायसीवर प्रक्रिया करुन पात्र ग्राहकांना त्वरित कर्ज मंजुर करतील. जर तुम्हाला फायनान्सची गरज नसेल तर तुम्ही फक्त ओला S1 साठी २०,००० रुपये आणि ओला S1 प्रो साठी २५,००० रुपये ॲडव्हान्स देऊ शकता. उरलेली रक्कम गाडी ताब्यात घेताना भरावी लागेल.
ओला इलेक्ट्रिकने सांगितले, गाड्यांची डिलिव्हरी ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल.त्याच महिन्यापासून, कंपनी टेस्ट राइड देणेदेखील सुरु करेल. टेस्ट राईड घेतल्यावर तुम्हाला गाडी आवडली नाही तर तुम्हाला ऑर्डर कॅन्सल करण्याचा पर्यायदेखील आहे. मात्र हे करण्याआधी तुमची गाडी ओला फॅक्टरीमधून शिप झाली नसली पाहिजे.
Comments are closed.