ITR भरला पण रिफंड नाही भेटला, ‘अस’ करा नेमक स्टेटस चेक

Income-tax refunds get credited to the bank accounts of assessees within a few weeks.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने(सीबीडीटी) एप्रिल 2021 आणि ऑक्टोबर 2021 दरम्यान 53.54 लाख करदात्याना 82,229 कोटी परतावा जारी केला आहे. जर तुम्ही तुमच्या कर परतावा मिळण्याच्या प्रतीक्षेत असाल तर खालील माहिती जाणून घ्या.

आयकर परताव्याच्या एकूण स्थितीची पडताळणी कशी घ्याल?

एकदा तुम्ही तुमचे आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरल्यानंतर , आयटी विभाग रिटर्नची प्रक्रिया करतो आणि आर्थिक वर्षात तुमच्याकडून जादा कर भरला असेल तर सदर परतावा जारी करतो.

आयकर परतावा हा काही आठवड्यांच्या आत संबंधितांच्या बँक खात्यात जमा होतो. कधीकधी, याला काही महिने देखील लागतात.

तुम्ही तुमचा ITR दाखल केल्यानंतर, दोन आठवड्यांनंतर परताव्याची स्थिती ट्रॅक केली पाहिजे. तुमच्या परताव्याची स्थिती तपासण्यासाठी www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com वर लॉग इन करा आणि “कर परताव्याची स्थिती” टॅबवर क्लिक करा, तुमचे पॅन आणि मूल्यांकन वर्ष (AY) तेथे टाका.

जर ITR विभागाने परताव्याची प्रक्रिया आधीच सुरु केली असेल, तर तुम्हाला पेमेंटची पद्धत, संदर्भ क्रमांक, स्थिती आणि परताव्याची तारीख नमूद करणारा संदेश मिळेल. जर परताव्यावर प्रक्रिया केली गेली नसेल किंवा नाकारली गेली असेल तर तसा संदेश प्राप्त होइल.

कधीकधी आयटीआर फॉर्ममध्ये चुकीच्या बँक खात्याचा तपशील नमूद केल्यामुळे किंवा परताव्याची माहिती भरण्यात चुका झाल्यामुळे कर परतावा मिळण्यास विलंब होतो.

चुकीचे बँक तपशील सुधारण्यासाठी, ई-फाइलिंग पोर्टल ( www.incometaxindiaefiling.gov.in ) मध्ये लॉग इन करा . “माझे खाते” वर नेव्हिगेट करा आणि “परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती” वर क्लिक करा. स्टेप्स पाळा आणि बँक खात्याचे योग्य तपशील तेथे आणि सबमिट करा. तुम्हाला काही दिवसात परतावा मिळू शकतो.

खोट्या ईमेल अड्रेस पासून सावध राहा.

आयकर विभागाच्या नावाने फिशिंग ईमेल, विशेषतः कर परताव्याशी संबंधित, खूप सामान्य गोष्ट आहे. हे फसवणुकीचे ईमेल ओळखणे खूप कठीण जाते, कारण डोमेन नावे हे आयकर विभागाच्या ईमेल आणि वेबसाइटच्या पत्त्यांची कॉपी करतात. फसवणूक करणारे लोगो, रंग थीम आणि मूळ वेबसाइटचे इतर पैलू देखील कॉपी करतात. म्हणून, करदाता म्हणून तुम्हाला अशा फिशिंग ईमेलपासून सावध राहणे आवश्यक आहे,अन्यथा, आपण आपले पैसे गमावू शकता.

हे कायम लक्षात ठेवा की कर विभाग ईमेलद्वारे करदात्याची कोणतीही गोपनीय किंवा आर्थिक माहिती शेअर करत नाही. जर एखाद्या ईमेलने बँक तपशील, पासवर्ड आणि ओटीपी सारखी गोपनीय आर्थिक माहिती मागितली असेल तर सावधगिरी बाळगा आणि अशा ईमेल आणि वेबसाइटची सत्यता तपासा. डोमेन नाव काळजीपूर्वक तपासा. प्रामुख्याने, बनावट ईमेलमध्ये आयकर विभागाच्या वेबसाइट्सचे चुकीचे स्पेलिंग असू शकते. तुम्ही मेसेज हेडर देखील तपासू शकता – उदाहरणार्थ, Gmail मध्ये, ‘ओरिजिनल दाखवा’ हा पर्याय निवडून ते बघता येतं.

आयकर विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तुम्हाला कोणत्याही ईमेलवर संशय असल्यास, अटॅचमेंट न उघडणे हे सोईस्कर ठरेल. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि गोपनीय माहिती जसे की बँक खाते आणि क्रेडिट कार्ड तपशील टाकू नका.

जर तुम्हाला फसवणूक वाटणारे कोणतेही ईमेल आले तर असे ई-मेल किंवा वेबसाइट URL phishing@incometax.gov.in वर पाठवा.

Comments are closed.