फॉसिलने लॉन्च केले नविन स्मार्टवॉच, ‘ही’ आहेत फिचर्स

The Gen 6 smartwatch will be available in 42mm and 44mm variants. Price range Rs 23,995-24,995.

फॉसिलने 22 सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये आपली Gen6 टचस्क्रीन स्मार्टवॉच लाइन लॉन्च करण्याची घोषणा केली.

यानुसार घड्याळाचे दोन आकार असतील. ज्यात 42mm आणि 44mm यांचा समावेश होइल. त्यांची किंमत 23,995 रुपयांपासून 24,995 रुपयांपर्यंत आहे. Gen6 भारतात 27 सप्टेंबरपासून खरेदी करता येईल. हे fossil.in आणि amazon.in वर ऑनलाईन उपलब्ध होईल.

घड्याळ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन वेअर 4100+ प्लॅटफॉर्मद्वारे पॉवर केले जाईल, जे युजर्सना फास्ट ॲप्लिकेशन लोड टाईम, रिस्पॉन्स युजर एक्सपेरीन्स आणि अधिक पोवर सप्लाय प्रदान करेल.

स्टेनलेस स्टीलच्या मध्ये टाइमपीस असतील, ज्यात 1.28 ” टचस्क्रीन डिजिटल डिस्प्ले आहे. हे 3 एटीएम (30 मीटर) पर्यंत स्विमप्रूफ आहे. यात 8 जीबी स्टोरेज आणि 1 जीबी रॅम आहे.

फॉसिलनुसार घड्याळाची बॅटरी चार्ज करण्याची गती 30 मिनिटांमध्ये 80% इतकी आहे. युजर्स याद्वारे हार्ट रेट ट्रॅक करु शकतात. यात नवीन SpO2 सेन्सर आणि स्पीकर फंक्शन आहे.

Gen6 गूगलच्या नवीन सिस्टम अपडेटला मॅच होईन. हे स्मार्टवॉच 2022 मध्ये वेअर ओएस 3 सिस्टम अपडेटसाठी देखील पात्र असेल .

फॉस्सिल ग्रुप, इंडियाचे एमडी वर्गीस म्हणाले, “Gen6 हा इन्नोवेशन चा खरा करार आहे. आम्हाला नवीन SpO2 सेन्सर आणण्याचा आणि इतर सुधारित वैशिष्ट्यांमध्ये बॅटरी चार्जिंग वेग वाढवण्याचा अभिमान आहे.”अमेरिकेत आणि जगभरातील इतर प्रमुख देशात एकाच वेळी भारतात Gen 6 लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे.”

क्वालकॉम टेक्नॉलॉजीज, वेअरेबल्सचे ग्लोबल हेड पंकज केडिया म्हणाले, “फॉसिल्स ग्रूपसोबत त्यांच्या नवीन स्मार्टवॉच, Gen 6 वर सहकार्य केल्याने आम्हाला आनंद होत आहे, जे आमच्या स्नॅपड्रॅगन वेअर 4100+ प्लॅटफॉर्मवर आधारित बाजारात येणारे पहिले उत्पादन आहे.

Comments are closed.