१० मिनिटांत घरपोच किराणा? हो हे शक्य आहे.. 

Grofers ramping up competition in express delivery segment

सध्या सगळेच नागरिक जमेल तेवढी खरेदी ऑनलाईन करण्याला प्राधान्य देत आहेत. यामध्ये विविध वस्तूंसोबत अगदी किराणासुद्धा ऑनलाईनच ऑर्डर केला जातो. मात्र किराणा ऑर्डर केल्यापासून तो मिळेपर्यंत १-२ दिवसांचा वेळ लागतोच. सॉफ्टबँक आणि झोमॅटो यांचे आर्थिक पाठबळ असलेली कंपनी ग्रोफर्स नेमका हाच प्रॉब्लेम सोडवणार आहे. ही कंपनी किराणा माल तुमच्यापर्यंत १० मिनिटांत पोहोचविणार आहे. विशेष म्हणजे सध्या कंपनी १५ मिनिटांत किराणा पोहोच करत आहे. आता यामध्ये आणखी ५ मिनिटांची कपात करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. कंपनी आपली सेवा भारतातील १० शहरांमध्ये पुरवणार आहे.

 

कंपनीचे कोफाऊंडर आणि सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी याबाबत कंपनीच्या ब्लॉगवर माहिती दिली आहे. या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, “तुमच्या घरी १० मिनिटांत किराणा पोहोचविण्याची आमची योजना आज आम्ही भारतातील १० व्य शहरात लाँच केली. सध्या आमचा डिलिव्हरी टाइम १५ मिनिटांच्या आसपास आहे. मात्र आमचे अंतिम ध्येय ही वेळ १० मिनिटांवर आणण्याचे आहे. यासाठी आम्ही अनेक पार्टनरशी साइन अप करतो आहोत आणि आमचे नेटवर्क विस्तारत आहोत. यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुढील ४५ दिवसात ग्राहकांसाठी आम्ही १० मिनिटांपेक्षा कमी वेळात किराणा पोहोचवू शकू.”

 

ग्रोफर्स सध्या ग्राहकांना ७००० जीवनावश्यक वस्तू पुरवते आहे. त्यांची ही सेवा दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, जयपूर, गाझियाबाद, नोएडा आणि लखनऊ येथे उपलब्ध आहे. ग्रॉफर्सने नुकतेच, ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोकडून १०० मिलियन डॉलर्सचे फंडिंग मिळवले आहे. तसेच कंपनी आता युनिकॉर्नसुद्धा बनली आहे.

 

ग्रोफर्सने मागच्या महिन्यात एकाच दिवसात ७००० ऑर्डर्सची डिलिव्हरी १५ मिनिटांत केली होती. इतर कंपन्यांमध्ये, स्विगीने लॉन्च झाल्यापासून वर्षभरात बेंगळुरू आणि गुरुग्राम पासून दिल्ली, मुंबई, हैदराबाद,चेन्नई आणि नोएडापर्यंत विस्तार केला आहे. बिगबास्केट आणि झोमॅटो ह्या दोन कंपन्या या क्षेत्रात अगोदरपासूनच आहेत.

 

टाटा सन्सने स्टेक विकत घेतल्यापासून बिगबास्केट त्याच्या एक्सप्रेस डिलिव्हरी सेगमेंटमध्ये वाढ करणार असल्याचे सांगितले जाते आहे. तसेच झोमॅटोनेदेखील ॲपवर ग्रॉसरी विक्री सुरू केली आहे आणि त्यासाठी 30-45 मिनिट वेळ निश्चित केला आहे.

Comments are closed.