टीसीएसची मोठी कामगिरी, १३ लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी दुसरी कंपनी

Tata Consultancy Services crossed the ₹13-lakh-crore mark in market value on Tuesday

भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने (TCS) आपल्या आयपीओनंतर १७ वर्षांनी १३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. भारतीय कंपन्यांमध्ये अशी कामगिरी करणारी टीसीएस ही दुसरी कंपनी ठरली. याआधी रिलायन्सने अशी कामगिरी केली आहे.

एडलवाईसने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘स्ट्राँग ऑर्डर बुक आणि स्ट्राँग डील पाईपलाईनमुळे कंपनीचा फायदा होतो आहे. यामुळे कंपनीची आणखी वाढ होण्यास मदत होईल.याशिवाय कंपनी सातत्याने आपला मार्केट शेअरदेखील वाढवते आहे.’

मंगळवारी दिवसभरात टीसीएसच्या शेअरने ३५६० रुपयांचा उच्चांकी भाव गाठला होता. आज बुधवारीदेखील हा ट्रेंड सुरु ठेवत शेअरने ३५९५ ची पातळी गाठली. यामुळे टीसीएसचे एकूण बाजारमूल्य  हे १३ लाख कोटींपेक्षा जास्त गेले होते. सध्या, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य हे १३.७ लाख कोटी रुपये आहे.

एडलवाईसने टीसीएसवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे, ज्याचे टारगेट ४१७६ रुपये प्रति शेअर आहे.

रिसर्च ऍनालिस्ट नीरव दलाल म्हणाले की,गेल्या महिन्यापर्यंत टीसीएसची कामगिरी साधारण होती. परंतु आयटी क्षेत्रात आलेल्या बूममुळे पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे आणि म्हणून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.”

टीसीएसने जून तिमाहीत, निव्वळ नफ्यात २८.५% टक्के वाढ नोंदवून ९००८ कोटी रुपये नफा प्राप्त केला आहे.

Comments are closed.