HDFC चा तिमाही निकाल जाहिर! नफा 8 हजार कोटी पार

HDFC Bank on Saturday reported a standalone net profit of ₹8,834 crore, up 18%, for the quarter ended 30 September, 2021

भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 8,834.31 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 17.6 टक्क्यांनी जास्त आहे. सदर तिमाहीत नफ्यातील सेक्वेटील वाढ 14.3 टक्के होती.

निव्वळ व्याज उत्पन्न, मिळवलेले व्याज आणि खर्च केलेले व्याज यातील फरक हा या तिमाहीत 12.1 टक्क्यांनी वाढून 17,684.4 कोटी रुपये झाला.

एचडीएफसी बँकेने आपल्या बीएसई फाईलिंगमध्ये म्हटले आहे की,”रिलेशनशिप मॅनेजमेंट, डिजीटल ऑफरिंग द्वारे कंपनीने 15.5 टक्क्यांची वाढ नोंदविली. कंपनीचा कोर नेट इंटरेस्ट मार्जिन 4.1% झाला.

Q2FY22 YoY मध्ये अॅडव्हान्स 11.98 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला. एकंदरीत कर्ज वाढीला देखील प्रोत्साहन मिळाले, “रिटेल सेगमेंटमध्ये 12.9 टक्के YoY वाढ झाली आणि व्यावसायिक आणि ग्रामीण बँकिंग विभागात 27.6 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

बँकेने पुढे म्हटले आहे की या तिमाहीत लयाबिलीटी वाढली आहे. यामुळे हेल्थी लिक्विडीटी कव्हरेज गुणोत्तर 123 टक्के ठेवण्यास मदत झाली.

सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 14.06 लाख कोटी रुपयांच्या ठेवी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.4 टक्क्यांनी वाढल्या. किरकोळ ठेवींमध्ये 17.5 टक्के आणि घाऊक ठेवी 2 टक्के YoY वाढला.

एचडीएफसी बँकेने म्हटले होते की, सप्टेंबर 2021 पर्यंत 6.58 लाख कोटी रुपयांच्या CASA ठेवी 28.7 टक्के YoY ने वाढल्या, सप्टेंबर 2021 पर्यंत CASA चे प्रमाण 47 टक्क्यांपर्यंत वाढले, जे Q2FY20 मध्ये 41.6 टक्के आणि Q1FY22 मध्ये 45.5 टक्के होते.

सप्टेंबर 2021 पर्यंत 1,451 कोटी रुपयांच्या फ्लोटिंग तरतुदी आणि 7,756 कोटी रुपयांच्या काँटिजन्स तरतुदी असल्याचे बँकेने म्हटले आहे आणि सप्टेंबर 2021 पर्यंत एकूण तरतुदी एकूण कर्जाच्या 163 टक्के आहेत.

आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रोविजन कव्हरेज गुणोत्तर 70.9 टक्के झाले, जे जून तिमाहीत 67.9 टक्के होते.

मालमत्ता गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून, सप्टेंबर 2021 पर्यंत नॉन परफॉर्म लोन एकूण अॅडव्हान्सच्या 1.35 टक्के होते, तर जून 2021 च्या तिमाहीत ते 1.47 टक्के होते.

प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिट 15,807.3 कोटी रुपयांवर आला, जो एकूण 14.4 टक्क्यांनी वाढला.

एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, Q2FY22 मध्ये त्यांचे 7,400.8 कोटी रुपयांचे इतर उत्पन्न (व्याज नसलेले उत्पन्न) 21.5 टक्क्यांनी वाढले आहे.

Comments are closed.