ब्रिटानियाचा Q2 रिझल्ट जाहीर! वाचा नफा-तोट्याच गणित

ब्रिटानिया इंडस्ट्रीजने आज आपला Q2 रिझल्ट जाहीर केला.Q1 च्या तुलनेत 2022 साठीचा Q2 रिझल्ट काही प्रमाणात निरशादायक आहे.

बेकरी प्रॉडक्ट्स आणि बिस्किट निर्माता कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजने 8 नोव्हेंबर रोजी 2022 मधील Q2 नफ्यात 22.9 टक्के वार्षिक घट नोंदवली.

सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या सदर तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा 381.8 कोटी रुपयांवर घसरला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीती हा आकडा 495.2 कोटी रुपयांवर होता.

सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल 5.5 टक्क्यांनी वाढून 3,607.4 कोटी रुपये झाला.

फर्मचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी म्हणाले,”सदर तिमाही दरम्यान, कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागला आणि आर्थिक उलाढाली वाढू लागल्या. परंतु महागाईचा ट्रेंड जगभरात सर्व क्षेत्रांमध्ये वाढताच राहिला.”

बेरी म्हणाले की, आम्ही पाम तेलाच्या बाजारभावात 54 टक्के, औद्योगिक इंधनाच्या 35 टक्के आणि पॅकेजिंगच्या 30 टक्के दराने महागाई अनुभवली. ज्यामुळे आमच्यासाठी तिमाहीत एकूण महागाई सुमारे 14 टक्के होती.”

कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये नफा वाढवण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत.

ब्रिटानियाचा EBITDA 17.4 टक्क्यांनी घसरून 558 कोटी रुपये झाला आणि मार्जिन 15.5 टक्क्यांवर घसरला.

बीएसईवर शेअरची किंमत 1.59 टक्क्यांनी वाढून 3,708 रुपयांवर बंद झाली.

Comments are closed.