मोटार इन्शुरन्स पॉलिसीच नूतनीकरण करताय तर मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात असूद्या

पॉलिसी नूतनीकरण करताना आपण मात्र काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मग या लेखातून आपण जाणून घेऊया मोटर इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करताना आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजेत.

बऱ्याचशा विमा पॉलिसीज या काही ठराविक कालावधीसाठी ॲक्टीव असतात. त्यांचा ठरलेला कालावधी संपला की त्यांचे वार्षिक नूतनीकरण करणे गरजेचे असते. पॉलिसी नूतनीकरण करताना आपण मात्र काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मग या लेखातून आपण जाणून घेऊया मोटर इन्शुरन्स पॉलिसीचे नूतनीकरण करताना आपण कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजेत.

1) इन्सुएर डिक्लेर व्हॅल्यू (IDV)

इन्सुएर डिक्लेर व्हॅल्यू हा मोटार विमा पॉलिसीमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. थेट प्रीमियमवर याचा परिणाम होतो.

IDV म्हणजे विम्याची एकूण रक्कम जी तुम्हाला जेव्हा तुमच्या गाडीचे संपूर्ण नुकसान झाल्यास किंवा तुमची गाडी चोरीला गेल्यास तुमच्या विमा कंपनीकडून मिळते.

जेव्हा तुम्ही पॉलिसी नूतनीकरण करता तेव्हा अनेक विमा कंपन्या तुम्हाला कमी प्रीमियम ऑफर करतात.परंतु कमी प्रीमियम हा तुमच्या विमा क्लेमवर परिणाम करू शकतो.

IDV हे वाहनाच्या मॉडेलनुसार आणि त्याच्या विक्री किंमतीच्या आधारावर निश्चित केले जाते.

2) नो क्लेम बोनस (NCB)

जर तुम्ही आधीच्या पॉलिसी पिरियडमध्ये कोणताही क्लेम दाखल केला नसेल तर तुम्ही नो क्लेम बोनससाठी पात्र ठरताल. जर ठराविक कालावधीत तुम्ही क्लेम केला नसेल तर तुमचा इन्सुएर तुम्हाला NCB ऑफर करतो. NCB सलग 5 क्लेम-फ्री वर्षांसाठी जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत आकारला जातो.

NCB द्वारे तुम्ही तुमचे ओन डॅमेज (OD) प्रीमियम कमी करू शकता, यामुळे तुम्ही पॉलिसी भरताना NCB निवडायला हवा. मात्र हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, NCB केवळ OD प्रीमियमवर लागू होतो, संपूर्ण प्रीमियमवर लागू होत नाही. OD आणि TP असे दोन्ही वेगळे प्रीमियम आहेत.

समजा तुमचा एकूण प्रीमियम 1,000 रू आहे आणि यातील 20 टक्के हा TP प्रीमियम आहे जो 200 रू आहे, म्हणजेच तुमचा OD प्रीमियम 800 रू आहे. या उदाहरणानुसार, NCB सवलत ही फक्त 800 च्या OD प्रीमियमवर लागू होईल.

3) ॲड ऑन फिचर्स 

स्टँडर्ड कव्हर व्यतिरिक्त, मोटार विमा पॉलिसीमध्ये अनेक ॲड ऑन उपलब्ध असतात. याद्वारे परवडणाऱ्या किंमतीत तुम्ही तुमच्या वाहनासाठी आवश्यक कव्हरेज मिळवू शकता. इंजिन प्रोटेक्शन कव्हर, झीरो डीप्रेशन कव्हर, नो क्लेम बोनस प्रोटेक्शन कव्हर, इनव्हॉइस कव्हरवर बरेच ॲड ऑन उपलब्ध होतात. जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

ॲड ऑन मधील एक प्रकार म्हणजे झिरो डेप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन शील्ड ॲड ऑन कव्हर जेथे क्लेम करताना डेप्रिसिएशन विचारात न घेता वाहनाच्या भागाची किंमत बाजारभावानुसार ठरवली जाते. ॲड ऑन हे क्लेम करताना फायदेशीर ठरतात.

4) ऐच्छिक कपात (Voluntary deductible)

तुम्ही तुमच्या मोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करत असताना, तुम्ही ऐच्छिक कपात करण्यायोग्य फिचर्सची निवड करण्याचा विचार करू शकता. जेव्हा विमाधारक क्लेमच्या वेळी काही विशिष्ट रक्कम भरतात तेव्हा ऐच्छिक कपातीचा लाभ मिळतो. ऐच्छिक कपातीच्याच्या क्लेमची रक्कम नंतर विमा कंपनीद्वारे भरली जाते. 5 वर्षांपेक्षा जास्त प्रमाणात वापरलेल्या वाहनासाठी ग्राहक ऐच्छिक कपातीची निवड करतात,कारण यामुळे मोटार विमा पॉलिसीचा एकूण प्रीमियम देखील कमी होतो.

5) पोर्टेबिलिटी

जेव्हा तुमचा मोटार विमा नूतनीकरण करत असाल, तेव्हा तुम्ही तुमची पॉलिसी इतर विमा कंपनीकडे पोर्ट करू शकता. जेव्हा विमाधारक उत्तम सेवा, चांगली क्लेम सेटलमेंट क्षमता, कमी प्रीमियम, चांगले कव्हरेज किंवा ॲड ऑन कव्हर असलेली पॉलिसी शोधत असेल तेव्हा पोर्टेबिलिटी हा पर्याय निवडला जाऊ शकतो. जर तुमची मोटार विमा पॉलिसी नवीन विमा कंपनीकडे पोर्ट केली गेली तर NCB सारखे फायदे मिळतात.

मोटार विम्यामध्ये, तुम्ही तुमच्या पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर तुमचा मिळवलेला NCB बोनस गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. NCB बोनस प्रीमियम कमी करण्यास मदत करतो. वेळेवर नूतनीकरण केल्याने तुम्हाला कमी प्रीमियमवर मोटार विम्याचे फायदे मिळतील.

Comments are closed.