बँकांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, मिळतंय ‘इतक्या’ टक्क्यात होमलोन

This offer will be applicable to all new loan applications irrespective of the loan amount or employment category, HDFC said

21 सप्टेंबर रोजी एचडीएफसी बँकेने सांगितले की, ते सणासुदीत ऑफरचा भाग म्हणून 6.7 टक्के दराने होमलोन देणार आहे.

या विशेष ऑफर अंतर्गत, ग्राहक 20 सप्टेंबर 2021 पासून 6.7 टक्के प्रमाणे एचडीएफसी होमलोन घेऊ शकतात, असे बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ही ऑफर कर्जाची रक्कम किंवा एम्प्लॉयमेंट कॅटेगरीची पर्वा न करता सर्व नवीन कर्ज अर्जांदारासाठी लागू होईल. जी कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडली जाईल.

ही क्लोज एंडेड योजना आहे आणि 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैध असेल, असे बँकने सांगितले.

एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी रेणू सुद कर्नाड यांनी सांगितले,”पूर्वीच्या तुलनेत आज घरं अधिक परवडणारी आहेत. गेल्या काही वर्षांत, देशभरातील प्रमुख भागात प्रॉपर्टीच्या किंमती कमी-अधिक प्रमाणात समान राहिल्या आहेत, तर उत्पन्नाची पातळी वाढली आहे. PMAY अंतर्गत कमी व्याज दर, सबसिडी नोंदवून तसेच कर लाभांची मदत देखील सध्या मदत होते.”

अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा आणि पीएनबीसह बँकांच्या क्लचने होमलोन चे दर कमी केले आहेत.

शनिवारी एसबीआयने सांगितले की, त्यानी होमलोनचे दर 6.70 टक्के केले आहेत. तसेच महिला कर्जदारांना 5 बीपीएसची विशेष सवलत मिळेल, असे बँकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ह्या कपातीमुळे, एसबीआय होमलोनचे व्याज दर आता 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.70 टक्के आणि 30 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 6.95 टक्के झाले आहे. 75 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जाला 7.05 टक्के दराने होमलोन मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. एसबीआयने म्हटले आहे की ग्राहक 5 बीपीएस अतिरिक्त व्याज सवलत मिळवण्यासाठी योनो ॲपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात.

यापूर्वी, एसबीआयने सणासुदीत ऑफरचा भाग म्हणून 31 मार्चपर्यंत होमलोनचे दर 6.7 टक्के केले होते जे 1 एप्रिलपासून 6.95 टक्के करण्यात आले होते.

कोटक महिंद्रा बँकेने 9 सप्टेंबर रोजी जाहीर केले की त्यानी 10 सप्टेंबरपासून होमलोनचे दर 15 बेस पॉइंटने कमी केले आहेत. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (KMBL) आता 6.65 टक्के ऐवजी 6.50 टक्के व्याज दराने होमलोन देणार आहे.

Comments are closed.